पुणे हादरलं! 17 वर्षीय तरुणीवर 15 दिवस बलात्कार, जोडप्याचं क्रूर कृत्य
Pune Rape Case: पुण्यात एका 17 वर्षीय तरुणीचं अपहरण करून तिच्यावर तब्बल 15 दिवस बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
जोडप्याने तरुणीला देहविक्रीला पाडलं भाग
आरोपी जोडप्याची तरुणीला जीवे मारण्याची धमकी
Pune Crime: पुणे: पुणे (Pune) शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली असून पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वडिलांच्या आजारपणासाठी उसने घेतलेले पैसे न दिल्याने एका 17 वर्षीय तरुणीला तब्बल 15 दिवस डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार करून तिला वेश्याव्यवसाय करण्यासाठी भाग पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (in pune 17 year old girl was raped for 15 days a brutal act by a couple)
ADVERTISEMENT
हा सगळा प्रकार ऑक्टोबर 2023 पासून सुरू होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पोक्सोसह इतर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पूनम माने (वय 22 वर्ष) आणि आकाश माने (वय 24 वर्ष) या दाम्पत्यावर गुन्हा दाखल असून पूनम माने हिला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरा आरोपी आकाश माने हा सध्या फरार आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांना काल पुण्यातील के के मॉल जवळ एका लॉजमध्ये एका मुलीला डांबून ठेवल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीची सुटका केली. तसेच ज्या लॉजवर हा प्रकार घडला आहे.. त्या सर्व लॉज मालकांची देखील पोलीस आता चौकशी करणार आहेत.
हे वाचलं का?
हे ही वाचा>> 'मी Gay आहे, मला घटस्फोट दे' नवऱ्याचा धक्कादायक खुलासा
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे वडील आजारी असताना तिने आरोपी दाम्पत्ययाकडून उपचारासाठी 30 हजार रुपये उसने घेतले होते. मात्र काही कारणामुळे मुलीला ते पैसे करता आले नाही.
त्यामुळे आरोपींनी 17 वर्षीय मुलीचं अपहरण केलं आणि तिला एका लॉजवर नेऊन तब्बल 15 दिवस डांबून ठेवलं. लॉजवर डांबून ठेवण्यात आलेल्या तरुणीवर आरोपी आकाश माने याने वारंवार बलात्कार देखील केला. यावरच न थांबता या दाम्पत्याने तिला जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने देहविक्रीस भाग पाडले आणि तिला वेशव्याव्यसाय करून आरोपींनी पैसे कमावले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> शक्तीवर्धक गोळ्या खाऊन पती बनला हैवान पत्नीचा मृत्यू
याबाबत परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील म्हणाल्या की, 'तरुणी ही पुण्यात राहत होती आणि आरोपी हे तिच्या शेजारी राहत होते. पीडित मुलीच्या वडिलांना दारूचं व्यसन होतं आणि वडिलांच्या आजारपणासाठी तिने आरोपींकडून 30 हजार रुपये घेतले होते. पण आरोपी हे पैसे मागत असताना ते परत करण्यासाठी मुलीकडे पैसे नव्हते म्हणून ती टाळाटाळ करत होती. पैसे परत देता येत नसल्याने आरोपींनी 17 वर्षीय मुलीला ताब्यात घेतलं आणि तिला एका लॉजवर नेऊन तिला 15 दिवस डांबून ठेवलं. लॉजवर डांबून ठेवण्यात आलेल्या तरुणीवर आरोपी आकाश माने याने वारंवार बलात्कार केला. यावरच न थांबता या दाम्पत्याने तिला जीवे मारण्याची धमकी देत तिला जबरदस्तीने देहविक्रीस भाग पाडले. याप्रकरणी आम्ही अधिक तपास करत आहोत.' असं यावेळी त्या म्हणाल्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT