‘तुम तो धोखेबाज हो’ गाण्यावर डान्स, शालूचा Exclusive व्हिडिओ.. सासऱ्याची हत्या अन् मास्टरमाईंड सून पार्टीत बेधुंद!

मुंबई तक

कानपूरमधील ६३ वर्षीय औषध व्यावसायिक विनीत मिनोचा हत्या प्रकरणात आरोपी सून शालूचा Exclusive व्हिडिओ समोर आला आहे. हत्येच्या रात्री पतीसोबत पार्टीत नाचताना ती दिसत आहे.

ADVERTISEMENT

kanpur vineet minocha murder case daughter in law shalu exclusive party dance video
सासऱ्याची हत्या अन् मास्टरमाईंड सून
Google CTA

कानपूर: कानपूरमधील 63 वर्षीय औषध व्यावसायिक विनीत मिनोचा यांच्या हत्या प्रकरणात आरोपी सून शालूचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ‘आज तक’च्या हाती लागलेल्या या व्हिडिओमध्ये शालू तिचा पती सुब्रतसोबत पार्टीत नाचताना दिसत आहे. विशेष म्हणजे, ही पार्टी त्याच रात्रीची असल्याचे सांगितले जात आहे, ज्या रात्री विनीत मिनोचा यांची त्यांच्या घरी हत्या झाली. पोलिसांच्या तपासानुसार, या हत्येच्या कटात शालूची कथित भूमिका समोर आली असून, तिला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

‘तुम तो धोखेबाज हो’ गाण्यावर पतीसोबत डान्स

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शालू गडद जांभळ्या रंगाचा गाऊन परिधान करून दिसत आहे. ती पती सुब्रतसोबत डान्स करत असून, पार्श्वभूमीवर ‘तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो’ हे गाणे वाजत आहे.

हे ही वाचा>> अमित ठाकरेंनी PM मोदींचा फोटो हटवला अन् आज 'या' महानगरपालिकेत तुफान राजकीय राडा

व्हिडिओमध्ये पार्टीचे वातावरण सामान्य दिसत आहे. आजूबाजूला लोक उपस्थित असून, शालूही अगदी सहजपणे डान्स करताना दिसते. मात्र, व्हिडिओतील दृश्यांवरून तिच्या मनातील भावना किंवा हत्येतील सहभागाबाबत स्वतंत्र निष्कर्ष काढता येत नाही.

रात्री 10.30 वाजता पार्टीत पोहोचल्याचा पोलिसांचा दावा

पोलिसांच्या माहितीनुसार, शालू आणि तिचा पती सुब्रत रात्री सुमारे 10.30 वाजता कॉस्मोजिन लाउंजमध्ये पोहोचले होते. पार्टी रात्री 11.30 वाजता सुरू होणार होती. तेथे सुमारे 20 ते 25 लोक उपस्थित होते. ‘आज तक’ला मिळालेल्या व्हिडिओमध्ये शालू याच पार्टीत पतीसोबत नाचताना दिसत आहे.