विधवा मुलीनं केली शिक्षक वडिलांची हत्या, रिक्षाचालकाच्या मदतीने कसा रचला कट?
विजापूरमधील एका मुलीनं शिक्षक वडिलांची हत्या केली. रिक्षाचालकासोबत मिळून तिने कट रचला आणि जन्मदात्याचा निर्घृण खून केला. याप्रकरणी मुलीला पोलिसांनी अटक केली असून रिक्षाचालक फरार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विधवा मुलीनं केली शिक्षक वडिलांची हत्या
प्रियकराच्या मदतीने कसा रचला कट?
Crime News : कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 62 वर्षीय निवृत्त शिक्षकाची त्यांच्या धाकट्या मुलीने, तिच्या प्रियकराने आणि एका साथीदाराने मिळून निर्घृण हत्या केली. मालमत्तेचा वाद आणि प्रेमासंबंधांना असलेला विरोध यातून हे हत्याकांड घडल्याचा संशय आहे. सिद्धप्पा अंजुटगी असे मृत निवृत्त शिक्षकाचे नाव असून त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आला होता. सुरुवातीला अज्ञात हल्लेखोरांनी ही हत्या केल्याचा संशय होता; मात्र सिद्धप्पा यांची मोठी मुलगी निकिता हिने नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता, धाकटी मुलगी प्रियांका हिचा या कटात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
रिक्षाचालकाशी जुळले प्रेमसंबंध
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धप्पा सुमारे दोन वर्षांपूर्वी शिक्षक पदावरून निवृत्त झाले होते आणि त्यांना निवृत्तीचे आर्थिक लाभ मिळाले होते. याशिवाय त्यांची त्यांच्या मूळ गावी मालमत्ताही होती. प्रियांकाचा पती सुरेश मसाली याचा कोरोना काळात मृत्यू झाला होता. त्यानंतर विजयपुरा येथे राहत असताना प्रियांकाचे संतोष शिंदे या रिक्षाचालकाशी प्रेमसंबंध जुळले. सिद्धप्पा यांचा या संबंधांना विरोध होता, तसेच त्यांनी प्रियांकाला मालमत्तेत हिस्सा देण्यासही नकार दिला होता. या कारणांवरून बाप-लेकीत सातत्याने वाद होत होते आणि घरातील तणाव वाढला होता.
हे ही वाचा : बायकोच्या गुप्तांगाला विजेचा शॉक देऊन संपवलं, 'त्या' कारणामुळे नवरा झाला क्रूर
आधी गळा आवळला, नंतर दगडाने ठेचून हत्या
15 ऑगस्ट रोजी प्रियांकाचे तिच्या वडिलांशी मालमत्तेच्या मुद्द्यावरून पुन्हा जोरदार भांडण झाले. हा वाद विकोपाला गेल्यानंतर प्रियांकाने तिचा प्रियकर संतोष याला फोन करून घरी बोलावून घेतले. त्या रात्री संतोष त्याचा मित्र गुरुराज बिरादार याच्यासह सिद्धप्पा यांच्या घरी पोहोचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी आधी सिद्धप्पा यांचा गळा आवळला आणि त्यानंतर रस्ता खोदण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या दगडाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला आणि तेथून पोबारा केला.
हे ही वाचा : प्रायव्हेट पार्ट विकून 1.20 कोटी रूपये मिळणार, रील पाहून आरोपीने मुलाचे गुप्तांग कापलं
मुलीला अटक, प्रियकर पळाला
तपासाअंती पोलिसांनी कारवाई करत प्रियांका आणि तिचा प्रियकर संतोष या दोघांना अटक केली आहे, तर या गुन्ह्यातील तिसरा आरोपी गुरुराज बिरादार हा अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मालमत्तेचा हव्यास आणि अनैतिक संबंधांना असलेला विरोध हेच या हत्येमागील मुख्य कारण असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सध्या पोलीस फरार आरोपीचा तातडीने मागोवा घेत असून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
