Crime : दरवाजा उघडायला केला उशीर अन् मुलांसमोरच पत्नीवर सपासप वार, जागेवरच सोडला जीव

भागवत हिरेकर

wife murder : उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली. पत्नीने दरवाजा उघडण्यास उशीर केला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर पतीने पत्नीची हत्या केली.

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Husband killed Wife : कधी कधी क्षणाचा राग तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करतो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील अलया अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आदित्य कपूरसोबत घडला. आदित्यचा कपड्यांचा शोरूम होता, पण कोरोना लॉकडाऊनमुळे त्याचा व्यवसाय बंद पडला. परिस्थिती इतकी बिकट झाली की कुटुंब जगवण्यासाठी त्याला दुसऱ्याच्या कपड्यांच्या दुकानात काम शोधावे लागले. त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये राहू लागला. अनेकवेळा त्याने आत्महत्या करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी तो वाचला. दु:ख विसरण्यासाठी तो दारूच्या आहारी गेला. नशेत त्याचे पत्नीशी अनेकदा भांडणं होत असे. एका छोट्या कारणावरून भांडण विकोपाला गेलं आणि जे घडू नये तेच घडलं.

आदित्य कपूरला शनिवारी (४ नोव्हेंबर) रात्री उशीर झाला होता. आदित्य रोजप्रमाणे नशेत घरी पोहोचला. उशीर झाल्यामुळे पत्नी शिवानी कपूर रागावली आणि लवकर दरवाजाच उघडला नाही. खूप वेळा आवाज दिल्यानंतर जेव्हा तिने दार उघडले तेव्हा आदित्य त्याच्या भांडू लागला.

हे ही वाचा >> किंग ‘कोहली’ सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत, बॅट तळपली घडवला ‘विराट’ इतिहास!

दोघांमधील भांडण इतके टोकाला गेले की, चिडलेल्या आदित्यने किचनमधून चाकू घेतला आणि शिवानीच्या अंगावर वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये तिच्या पाठीला व मानेला गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ होऊन ती तिथेच पडली. इथे धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांच्या दोन्ही मुलांच्या डोळ्यासमोर सर्व काही घडत होते. भीती आणि दहशतीमुळे मुले सुरुवातीला काहीच बोलली नाहीत, मात्र आईची हत्या झाल्याचे पाहून त्यांनी वडिलांवर तुटून पडले.

बापाला खोलीत कोंडायला गेले, पण…

दोन्ही मुलांनी आदित्यला एका खोलीत नेलं आणि बाहेरून कुलूप लावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्यांना ढकलून दिले आणि तेथून पळ काढला. स्वतःला वाचवण्यासाठी आदित्य कपूरने तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला मेडिकल कॉलेजच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp