Manipur: महिलांची नग्न धिंड काढल्याप्रकरणी ‘इतक्या’ जणांना अटक, कोण आहेत आरोपी?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

manipur voilence kuki women rape video viral police arrested 5 accused
manipur voilence kuki women rape video viral police arrested 5 accused
social share
google news

Manipur Gangraped Case: मणिपुरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या संदर्भात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट पसरली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर आरोपींवरील कारवाईला वेग आला होता. आता य़ा प्रकरणात पाच आरोपींना अटक केली आहे. तसेच इतर आरोपींचा शोध सुरु आहे. (manipur voilence kuki women rape video viral police arrested 5 accused)

घटनेच्या निषेधार्थ महिलांचे आंदोलन

मणिपुरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न करून त्यांची धिंड काढली होती. इतकेच नाही तर या दोन महिलांना शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. 4 मे 2023 रोजी मणिपूरच्या थौबाल जिल्ह्यात ही घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला होता. या व्हिडिओत महिलांसोबत झालेल्या अत्याचाराने संपूर्ण देश हादरला होता. सर्वोच्च न्यायालयाने देखीव केंद्र आणि राज्य़ सरकारला फटकारले होते. त्यानंतर या घटनेला वेग आला होता. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज अनेक महिलांनी इंफालमध्ये मोर्चा काढला आहे. टायर जाळून महिलांनी या घटनेचा निषेध केला होता. या दरम्यान आंदोलक महिला आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली आहे.

आरोपींना अटक

दरम्यान या घटनेत पोलिसांनी 24 तासास हुइरेम हेरादास, अरूण सिंह, जीवन इलांगबाम आणि तोम्बा सिंह या 4 आरोपींना अटक केली आहे. हे चारही आरोपी हे थौबाल्या जिल्ह्याचे रहिवाशी आहेत. तर आज शनिवारी पोलिसांनी नुंगसिथोई मेटेई (19 वय) या पाचव्या आरोपीला अटक केली. नोंगपोक सेकमाई अवांग लीकाईचा तो रहिवाशी होता. व्हायरल व्हिडिओच्या मदतीने आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली आहे. मणिपूर पोलीस आणि केंद्रीय दलाने 12 टीम बनवून 12 संशयीत आरोपीचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नेमकी घटना काय?

खरं तर या घटनेत हजारोंच्या जमावाने गावावर हल्ला केला होता. या जमावाने महिलांना कपडे उतरवण्यास भाग पाडले होते. जो व्यक्ती जमावाच्या या कृत्याला विरोध करायचा त्याची हत्या केली जायची. या जमावाच्या हाती यावेळी 21 वर्षाची एक तरूणी, 42 आणि 52 वर्षांची एक महिला लागली होती. या महिलांना कपडे उतरवण्यास भाग पाडतं त्यांची नग्न धिंड काढण्यात आली होती. यामधील काही महिलांना शेतात नेऊन त्यांच्यासोबत सामूहिक बलात्कारही करण्यात आला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

या घटनेप्रकरणी 18 मे ला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या तीन दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र गुन्हा दाखल करून सुद्धा तब्बल दोन महिने आरोपींना अटक झाली नव्हती. बुधवारी 19 जुलैला तरूणींचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. नोंगपोक सेकमाई पोलीसांनी या प्रकरणी अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गु्न्हा दाखल केला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT