crime : तरुणासोबत लॉजवर राहिलेल्या अल्पवयीन मुलीनं स्वत:ला संपवलं, कारण वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल
Chandrapur Crime News : महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात खळबळजनक घटना घडलीय. एका अल्पवयीन मुलीने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
चंद्रपूर जिल्ह्यात खळबळजनक घटना घडली, यामागचं कारण काय?
तरुणासोबत लॉजवर राहिलेल्या अल्पवयीन मुलीने स्वत:चं जीवन संपवलं
हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यावर कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली
Chandrapur Crime News : महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात खळबळजनक घटना घडलीय. एका अल्पवयीन मुलीने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही मुलगी एका तरुणासोबत लॉजवर रात्रभर राहिली होती. त्यानंतर या मुलीने तरुणावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करत स्वत:ला संपवलं. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.(A sensational incident has taken place in Chandrapur district of Maharashtra. A shocking case of a minor girl committing suicide by hanging herself at home has come to light)
ADVERTISEMENT
चंद्रपूर जिल्ह्याच्या एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय मुलगी सोमवारी बल्लारपूर शहरात एका लॉजवर 19 वर्षीय तरुणासोबत राहिली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीकडे याबाबत विचारपूस केल्यावर तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचं मुलीनं सांगितलं. मुलीच्या घरच्यांना हा धक्कादायक प्रकार समजल्यावर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.
हे ही वाचा >> Today Horoscope : या' राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज! जाणून घ्या आजचं राशी भविष्य
त्यानुसार पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तरुणाला अटक केली. या प्रकरणी गुन्दा दाखल झाला असून आरोपीला बेड्या ठोकल्या, त्यामुळे हे प्रकरण शांत झालं आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. परंतु, पीडित मुलीनं बुधवारी गळाफास घेऊन आत्महत्या केली. मुलीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी लॉजचा मालक आणि व्यवस्थापकाला अटक केली. अल्पवयीन मुलीला लॉजवर राहण्याची परवानगी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Mumbai Times Tower Fire: टाइम्स टॉवरला भीषण आग! अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल
चंद्रपूरमध्ये अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येची घटनेमुळं नागरिकांंमध्ये संतापाचं वातावरण पसरलं होतं. परंतु, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. त्यामुळे परिसरात शांतातपूर्ण वातावरण असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. अल्पवयीन मुलगी एका तरुणासोबत लॉजवर रात्रभर राहिली होती. त्यानंतर या मुलीने तरुणावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करत स्वत:चं आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT