Mumbai Times Tower Fire: टाइम्स टॉवरला भीषण आग! अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल
Mumbai Times Tower Fire : मुंबईच्या कमला मिल परिसरातील टाईम्स टॉवरला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुंबईच्या कमला मिल परिसरातील टाईम्स टॉवरला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग
अग्निशमन दलाचे 8 ते 9 बंब घटनास्थळी दाखल
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
Mumbai Times Tower Fire : मुंबईच्या कमला मिल परिसरातील टाईम्स टॉवरला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 8 ते 9 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे.
सकाळी साडेसातच्या सुमारास ही आग लागली. माहितीनुसार, कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र काहीजण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा : Maharashtra Weather: जरा जपून... धो-धो पाऊस बरसणार! IMD चा 'या' जिल्ह्यांना अलर्ट
टाइम्स टॉवर ही लोअर परळ भागातील कमला मिल्स कंपाऊंडमधील व्यावसायिक इमारत आहे. या इमारतीला सकाळी साडेसहा वाजता आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीचे व्हिडिओही समोर आले आहेत, जे खूपच भयंकर आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
आगीची तीव्रता पाहता अग्निशमन दलाच्या 8 ते 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे.
अग्निशमन दलाने इमारतीच्या आत शोध मोहीम सुरू केली आहे. ही व्यावसायिक इमारत असल्याने आत कोणीही राहत नाही. अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार आग सध्या आटोक्यात आली आहे. मात्र, ज्या ठिकाणी आग लागली आहे त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे धुराचे मोठे लोट बाहेर पडत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : 'मुख्यमंत्री' शब्द वगळला! लाडक्या बहिणींवरून महायुतीतल्या भावांचे एकमेकांना चिमटे, मंत्रिमंडळ बैठकीत काय घडलं?
2017 मध्ये घडला भयानक प्रकार! 14 जणांना गमावावा लागला होता जीव
यापूर्वी 29 डिसेंबर 2017 रोजी कमला मिल परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागली होती. यात 14 जणांचा मृत्यू झाला होता तर, अनेक जण जखमी झाले होते. त्याचबरोबर, 2017 मध्ये फेब्रुवारी महिन्यात दिल्लीच्या आयटीओ जवळील टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही आग लागली. या आगीने भीषण रूप धारण केले होते. आग पहिल्या मजल्यावरून सुरू झाली आणि काही वेळातच इमारतीच्या चारही मजल्यांना आग लागली. आग विझवण्यासाठी पंचवीसहून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT