Maharashtra Weather: जरा जपून... धो-धो पाऊस बरसणार! IMD चा 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra Weather Update News : राज्यातील काही भागात पावसाने थैमान घातल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत IMD चा अंदाज जाणून घेऊया...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज्यातील काही भागात पावसाने थैमान घातल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा धोक्याचा इशारा

हवामान विभागाने काही जिल्ह्यांना कोसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
Maharashtra Weather Update News : राज्यातील काही भागात पावसाने थैमान घातल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी नाल्यांना पूर आले आहेत. अशावेळी धरणांच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. आज (6 सप्टेंबर 2024) हवामान विभागानेही (IMD) काही जिल्ह्यांना कोसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत तुमच्या शहरात हवामानाचा अंदाज नेमका काय आहे? जाणून घेऊया...
हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार पुढील 24 तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहाणार असून, मधूनमधून मध्यम ते तीव्र सरी कोसळण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Gadchiroli Video : काळजावर वार... दोन्ही मुलांचा एकाच वेळी मृत्यू, आई-वडिलांची मृतदेह खांद्यावर घेतला अन 15 किमी...
'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा धोक्याचा इशारा
कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड परभणी, लातूर, तसेच धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे. तसंच, पुढील 5 दिवस मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.
दुसरीकडे विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबईसह उपनगरातही आज शुक्रवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे आणि ठाण्यासह संपूर्ण कोकणाला आज पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.