Gadchiroli Video : काळजावर वार... दोन्ही मुलांचा एकाच वेळी मृत्यू, आई-वडिलांची मृतदेह खांद्यावर घेतला अन 15 किमी...
Gadchiroli Viral Video : गडचिरोली जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत आई-वडिलांनी आपल्या दोन लेकरांचे मृतदेह आपल्याच खांद्यावर घेऊन 15 किलोमीटर पायपीट केल्याची घटना घडली आहे. प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे ही घटना घडली आहे. या घटनेचा हृदयद्रावर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दोन लेकरांचा मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडीलांची पायपीट

आई-वडीलांनी तब्बल 15 किलोमीटर पायपीट

आरोग्य व्यवस्थेचे भीषण वास्तव दर्शवणारा व्हिडिओ
Gadchiroli Viral Video : गडचिरोली जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत आई-वडिलांनी आपल्या दोन लेकरांचे मृतदेह आपल्याच खांद्यावर घेऊन 15 किलोमीटर पायपीट केल्याची घटना घडली आहे. प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे ही घटना घडली आहे. या घटनेचा हृदयद्रावर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता या घटनेवरून विरोधकरांनी सरकारवर टीकास्त्र डागायला सुरूवात केली आहे. (gadchiroli viral video father and mother 15 kilo meter walk child deadbody vijay wadettiwar and sanjay raut criticize)
गडचिरोलीतील या हादरवून टाकणाऱ्या घटनेचा व्हिडिओ एक्सवर शेअर करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना घेरलं आहे. ''गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा आहे. आणि हेलिकॉप्टरने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महायुतीतील कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ आहे. दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगत असतात,अशी टीका वडेट्टीवार यांनी फडणवीस आणि आत्राम यांच्यावर केली आहे.
हे ही वाचा : Jaydeep Apte: वकिलाच्या संपर्कात असलेला जयदीप आपटे पोलिसांना का नाही सापडला?.. नेमकं काय घडतंय
वडेट्टीवार ट्विट जशाचं तसं...
''दोन्ही लेकरांचे ‘मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेले हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आहे.''
''आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. वेळेत उपचार मिळाले नाही. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला.''