Dombivali Crime : तोंडावर उशी ठेऊन लेकीला संपवलं! नंतर आईने केली आत्महत्या, रात्री बाबा घरी येताच..
Dombivali Latest Crime Update : डोंबिवलीमध्ये एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. अडीच वर्षाच्या चिमुकलीची हत्या केल्यानंतर आईने आत्महत्या केल्याची घटना डोंबिवली -कल्याण शीळ रोडवरील हाय प्रोफाईल रूनवाल मायसिटीमध्ये घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पोटच्या लेकीची हत्या करून आईने स्वत:लाही संपवलं
डोंबिवलीच्या हायप्रोफाईल सोसायटीत घडली धक्कादायक घटना
रात्री महिलेचा पकी घरी येताच असं काही घडलं...
Dombivali Latest Crime Update : डोंबिवलीमध्ये एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. अडीच वर्षाच्या चिमुकलीची हत्या केल्यानंतर आईने आत्महत्या केल्याची घटना डोंबिवली -कल्याण शीळ रोडवरील हाय प्रोफाईल रूनवाल मायसिटीमध्ये घटना घडली आहे.
रविवारी रात्रीच्या सुमारास या महिलेचा पती घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पूजा सकपाळ (२९) असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. तर समृद्धी सकपाळ असं हत्या झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. (A shocking incident has created a stir in Dombivali. After killing a daughter mother committed suicide. The incident took place in high profile Runwal Mycity on Dombivali-Kalyan Shil Road)
ADVERTISEMENT
डोंबिवली-कल्याण शीळ रोड लगत असलेल्या रुनवाल माय सिटी सोसायटीमध्ये राहूल सकपाळ (३५) हे पत्नी पूजा आणि अडीच वर्षाची मुलगी समृद्धीसोबत राहत होते. चार वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. आयटी इंजिनियर असलेला राहुल रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरी आले असता त्यांना धक्काच बसला. कारण त्यांची पत्नी पूजाने अडीच वर्षाच्या समृद्धीची तोंडावर उशी दाबून हत्या केली. त्यानंतर पूजाने स्वतः देखील आत्महत्या केली.
हे ही वाचा >> Snake Optical Illusion : गवतात लपलाय खतरनाक साप! गरुडासारखी नजर असेल तर शोधून दाखवा
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघींचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. दरम्यान, पूजाने असे टोकाचे पाउल का उचलले ? हत्या आणि आत्महत्येचे काय कारण होते ? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
हे वाचलं का?
मिळालेल्या माहितीनुसार, अडीच वर्षाच्या चिमुकलीची हत्या केल्यानंतर आईने आत्महत्या केल्याची घटना डोंबिवली -कल्याण शीळ रोडवरील हाय प्रोफाईल रूनवाल मायसिटीमध्ये घटना घडली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास या महिलेचा पती घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. डोंबिवली-कल्याण शीळ रोड लगत असलेल्या रुनवाल माय सिटी सोसायटीमध्ये राहूल सकपाळ (३५) हे पत्नी पूजा आणि अडीच वर्षाची मुलगी समृद्धीसोबत राहत होते. चार वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. आयटी इंजिनियर असलेला राहुल रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरी आले असता त्यांना धक्काच बसला.
हे ही वाचा >> Ashish Pandey Clip Viral : मराठी माणसांशी पंगा! TC ला नोकरीच गमवावी लागली, रेल्वेनं थेट...
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT