Ashish Pandey Clip Viral : मराठी माणसांशी पंगा! TC ला नोकरीच गमवावी लागली, रेल्वेनं थेट...

मुंबई तक

ADVERTISEMENT

TC Ashish Pandey Latest News
TC Ashish Pandey Audio Clip viral
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मराठी माणसांना एकही रुपयाचा बिझनेस देणार नाही म्हणणाऱ्या टीसीला घडली कायमची अद्दल

point

टीसी आशिष पांडेची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल

point

टीसी आशिष पांडे मराठी व्यापाराला नेमकं काय म्हणाला?

TC Ashish Pandey Audio Clip Viral: येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका येऊ घातल्या असतानाच रेल्वेत काम करणारे टीसी आशिष पांडेंनी खळबळजनक व्यक्तव्य केलं आहे. मी मुस्लिम आणि मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही, असं वक्तव्य करणाऱ्या टीसी पांडें यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर रेल्वे विभागाने पांडे याचं थेट निलंबन केलं. (The audio clip of TC Pandey making the statement that I will not give even a single rupee of business to a Muslim or Marathi person went viral)

ADVERTISEMENT

व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिपमध्ये अशिष पांडे काय म्हणाले?

टीसी आशिष पांडे यांनी एका मराठी व्यापाऱ्याशी केलेल्या संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये पांडे यांनी म्हटलंय की, मी यूपीचा आहे. माझं नाव आशिष पांडे आहे. मी विक्रोळीला टागोर नगरला राहतो. मी मोठा झाल्यापासून मुस्लिम आणि मराठी माणसांना बिझनेस देत नाही. मी मुस्लिम आणि मराठी माणसांच्या ऑटोतही बसत नाही. यपीचा रिक्षावाला असेल, तरच मी बसतो. मी तुम्हाला मेसेज पाठवला होता.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana List: लाडकी बहीण योजनेची 1500 रुपयांची नवीन लिस्ट पाहिली का? लगेच तपासा तुमचं नाव

जो मी डिलीट केला आहे. तुम्हाला आठवत असेल. मी तुमचं नाव कॉलर आयडीवर पाहिलं, तेव्हा मला माहित झालं की व्यक्ती महाराष्ट्रीयन आहे. मला याच्यासोबत धंदा करायचा नाही. मी त्याचा नफा होऊ देणार नाही. मी 9 वाजता कामाला जातो आणि 10 वाजेपर्यंत मी 5 हजार रुपये कमावलेले असतात. मी एक निश्चय केला आहे की, मुस्लिम आणि मराठी लोकांना एक रुपयाचा बिझनेस देणार नाही. 

हे वाचलं का?

आशिष पांडे यांनी मराठी माणसाशी केलल्या संभाषणाची क्लिप इंटरनेटवर व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मराठी माणसांच्या मुद्द्यावरून नेटकरी चांगलेच संतापले असून या क्लिपला विविध प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. नेटकऱ्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून डीआरएम मुंबई सेन्ट्रलने आशिष पांडे याचं निलंबन केलं आहे. 

हे ही वाचा >> IND vs BAN: दिग्गज कपिल देव, अश्विन आणि हरभजनचा विक्रम मोडला, टीम इंडियाचा हुकमी एक्का कोण?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT