डिलिव्हरी बॉय बनला आधी रुग्ण, नंतर थेट चाकू काढला आणि डॉक्टरानाच…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbai crime mumbai crime delivery boy robbed doctor knife tried steal gold
Mumbai crime mumbai crime delivery boy robbed doctor knife tried steal gold
social share
google news

Mumbai Crime: मुंबईतील पेडर रोड या अलिशान परिसरातील एका वरिष्ठ महिला डॉक्टरांना (Women Doctor) लुटण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दक्षिण मुंबईतील गावदेवी पोलीस स्थानकात 23 वर्षाच्या युवकाला अटक (boy arrested) केली आहे. अर्जुन सोनकर असे त्याचे नाव असून तो वरळीमध्ये (Warali) राहतो ऑनलाईन फूड डिलिव्हर (online food delivery boy) ॲपसाठी तो डिलिव्हरी बॉय म्हणून तो काम करतो.(mumbai crime warali delivery boy robbed doctor knife tried gold)

ADVERTISEMENT

फूड डिलिव्हरी ते आरोपी

अर्जुन सोनकर हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून गोंडा येथील राहणारा आहे. तो मे महिन्यापासूनच फूड डिलिव्हरीसाठी काम करतो. अर्जुन सोनकरने स्वतः पेशंट असल्याचे खोटं सांगून डॉ. मंदाकिनी पिरांकर यांच्या रुग्णालयात गेला होता. गेल्या 25 वर्षे या परिसरात डॉ. पिरांकर या तज्ज्ञ डॉक्टर म्हणून ओळखल्या जातात.

हे ही वाचा >> ‘…अन्यथा मुख्यमंत्री व्हायचं केवळ स्वप्न राहतं’, अजित पवार असं का बोलले?

 सुप्रसिद्ध डॉक्टर

ज्या दिवशी म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी ही घटना घडली त्यादिवशी सहाव्या मजल्यावर असणाऱ्या डॉ. पिरांकर यांच्या रुग्णालयात बनावट रुग्ण बनून सोनकर गेला होता. त्यावेळी त्याला थोडा वेळ बाहेर बसण्यास सांगितले. त्यानंतर त्याला डॉक्टरांच्या केबिनमध्ये बोलवले. त्यावेळी त्याने आपली ओळख अविनाश पासवान असल्याचे सांगितले. तपासल्यानंतर त्याला डॉक्टरांनी तुमचा रक्तदाब कमी झाल असून रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. त्यानंतर त्या अर्जुन सोनकरने डॉक्टरांची फी म्हणून दोनशे रुपयेही दिली होती.

हे वाचलं का?

चाकू घेऊन डॉक्टरांजवळ

डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर तो केबिनच्या बाहेर आला व नंतर पुन्हा तो डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला. त्यावेळी कपड्यात गुंडाळलेल्या चाकू त्याने बाहेर काढला आणि डॉक्टरांच्या गळ्याला लावला. मंदाकिनी यांच्या गळ्याला चाकू लावून त्याने डॉक्टरांच्या गळ्यातील सोन्याची चैन व लॉकेट काढण्यास सांगितले. त्या दागिन्यांची किंमत कमीत कमी एक लाख रुपये आहे. त्यानंतर डॉक्टरांना धक्का देऊन तो पळून गेला होता.

हे ही वाचा >> ‘आता मृत्यूपेक्षा सुंदर काहीच नाही’, माजी प्राध्यापिकेला का हवंय इच्छामरण?

भावनिक पत्र लिहिले

ज्या अर्जुन सोनकरने दागिने पळवून घेऊन गेला होता, त्यावेळी त्याने आपली बॅग तिथेच टाकून गेला होता. त्यावेळी त्या डायरीमध्ये लिहिले होते, मी हे करणार नव्हतो, पण मला हे नाईलजास्तव करावे लागत आहे. त्याने हे केले असले तरी भावनिक पद्धतीने सांगितले होते. कारण त्याला वाटले होते हे वाचून त्याच्या विरोधात पोलिसात कुणी तक्रार करणार नाही असं त्याला वाटत होते, असं सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

रुग्ण असल्याचे नाटक

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, तो स्वतः पेशंट असल्याचे नाटक करुन तो डॉक्टरांना लूटण्यासाठीच रुग्णालयात गेला होता. त्याने लुटलेल्या साहित्याची अजून चौकशी सुरु असून त्याने पहिल्यांदाच हा गुन्हा केला आहे. त्यानंतर तो आपल्या पत्नीबरोबर वरळीत थांबला होता. या प्रकरणात पोलिसांनी 16 हजार रुपये, एक चाकू, स्वीगी टीशर्ट, डायरी ताब्यात घेतली आहे. हे सर्व साहित्य त्याने डॉक्टरांच्या रुग्णालयातच सोडून गेला होता. अर्जुन सोनकरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT