Mumbai Crime : मुलाच्या फ्लाईटचं तिकिट काढलं अन्...,पेडणेकर दाम्पत्याचा भयानक शेवट!
Mumbai Crime News : पत्नीची हत्या करून पतीने बिल्डिंगमधून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. किशोर पेडणेकर (56) आणि राजश्री पेडणेकर (54) असे या दाम्पत्याची नावे आहेत. विशेष म्हणजे या आत्महत्येपुर्वी किशोर पेडणेकर यांनी त्यांच्या मुलाचं फ्लाईटचं तिकीट काढलं होतं आणि बँकेंच्या तपशीलही दिला होता.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पत्नीची हत्या करून पतीने बिल्डिंगमधून उडी घेऊन आत्महत्या
गोरेगावच्या टोपीवाला सोसायटीमध्ये ही घटना घडली
आत्महत्येपूर्वी मुलाला पाठवलं फ्लाईटचं तिकीट पाठवलं
Mumbai Crime News : मुंबईच्या गोरेगावमधून (Goregaun Crime) एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत पत्नीची हत्या करून पतीने बिल्डिंगमधून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. किशोर पेडणेकर (56) आणि राजश्री पेडणेकर (54) असे या दाम्पत्याची नावे आहेत. विशेष म्हणजे या आत्महत्येपुर्वी (Suicide) किशोर पेडणेकर यांनी त्यांच्या मुलाचं फ्लाईटचं तिकीट (Flight Ticket) काढलं होतं आणि बँकेंच्या तपशीलही दिला होता. त्यामुळे पेडणेकर यांनी नेमकं असं का केलं? याचा तपास आता पोलीस करतायत. (mumbai crime news wife murder and husband committed suicide goregaon shocking crime story)
गोरेगावच्या टोपीवाला सोसायटीमध्ये पेडणेकर दाम्पत्य वास्तव्यास होते. या पेडणेकर दाम्पत्याला एक मुलगा होता, जो दिल्लीला राहत आहे. घटनेच्या दिवशी अचानक किशोर पेडणेकर यांनी बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावरून खाली उडी घेतली होती. या घटनेनंतर किशोर यांना तत्काल रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.
हे ही वाचा : Viral Video News : सेल्फीचा नाद पडला भारी! पुण्यातील तरुणी कोसळली दरीत, व्हिडीओ बघा
या घटनेनंतर पोलिसांनी किशोर पेडणेकर यांच्या नातेवाईकांची शोधाशोध सुरु केला. या दरम्यान पेडणेकर यांच्या घराला टाळा होता. आणि या घराची चावी पेडणेकर यांच्याच गळ्यात होती. त्यामुळे पोलिसांनी ही चावी काढून कुलुप उघडले असता त्यांना धक्काच बसला. कारण घरात राजश्री पेडणेकर या मृताअवस्थेत पडल्या होत्या. त्यांचा चादरीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे किशोर पेडणेकर यांनीच राजश्री यांची हत्या करून आत्महत्या केल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय होता.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
दरम्यान गेल्या दोन-अडीच वर्षापासून किशोर पेडणेकर हे तणावात होते. तसेच त्यांना उच्च मधुमेहही होता. तसेच किशोर पेडणेकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एका नातेवाईकाला मेसेज करून त्यांची बँक खाती, मालमत्तेची माहिती दिली. तसेच मी जिवंत नसेत अशीही माहिती दिली होती. आणि दिल्लीत राहणाऱ्या मुलाला फ्लाईटचं तिकीट पाठवून रात्री 9 पर्यंत मुंबईत येण्यास सांगितलं, असं पोलीस तपासातून समोर आलं आहे.
हे ही वाचा : Aishwarya Rai : अभिषेकने 'घटस्फोटाची पोस्ट' लाईक केल्यानंतर पहिल्यांदाच बोलली ऐश्वर्या राय
दरम्यान आता पोलिसांनी संबंधित प्रकरणात त्यांच्या मुलाला मुंबईला बोलावलं असून त्याचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. प्राथमिक तपासात प्रथम महिलेचा खून झाला असावा आणि नंतर पतीनं आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT