नग्न अवस्थेत महिलेचा मुंडकं छाटलेला मृतदेह! दोन्ही हात सुद्धा... पोलिसांना 'तो' संशय
एका नाल्यात अज्ञात महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याचं वृत्त आहे. इतकेच नव्हे तर, पीडित महिलेचं हात आणि मुंडकं देखील छाटलेलं होतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नग्न अवस्थेत मुंडकं छाटलेला महिलेचा मृतदेह!
महिलेचे दोन्ही हात सुद्धा... पोलिसांना 'तो' संशय
Crime News: दिल्लीतील नोए़़डा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील पोलीस स्टेशन हद्दीपासून काही अंतरावर असलेल्या एका नाल्यात अज्ञात महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याचं वृत्त आहे. इतकेच नव्हे तर, पीडित महिलेचं हात आणि मुंडकं देखील छाटलेलं होतं. पोलिसांनी घटनास्थळी बराच शोध घेतल्यानंतर सुद्धा मृत महिलेचा हात आणि डोकं सापडलं नाही. आता पोलिसांनी या घटनेचा पर्दाफाश करण्यासाठी पथके नेमली आहेत. तसेच, काही लोक अशा अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने तिचा बळी दिला असावा, असा संशय व्यक्त करत आहेत.
विचित्र अवस्थेत महिलेचा मृतदेह
सेक्टर 108 मधील पार्क लॉरेट सोसायटी समोर असलेल्या रस्त्यावरून एका व्यक्ती बाईकवरून जात होती. अचानक ती व्यक्ती तिथे शोचासाठी थांबली आणि तिथे नाल्याजवळ पोहोचल्यानंतर त्याला विचित्र अवस्थेत महिलेचा मृतदेह दिसला. स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं.
हे ही वाचा: "माझे पती मला शारीरिक सुख..." तरूणीचा 'तो' आरोप अन् पत्नीने उघड केले सगळेच पत्ते!
महिला विवाहित असल्याचं स्पष्ट...
पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेचा मृतदेह नग्नावस्थेत होता. तिचं मुंडकं छाटलेलं होतं आणि मनगटांपासून दोन्ही हात सुद्धा कापलेले होते. महिलेचं डोकं आणि हात सापडले नसल्याने पोलिसांना तपासादरम्यान अडचणी येत आहेत. पीडितेच्या दोन्ही पायांमध्ये जोडवी असल्याकारणाने ती विवाहित असल्याचं स्पष्ट झालं. तसेच, तिचं वय जवळपास 30 ते 35 वर्षे असल्याचा अंदाज लावला जात आहे. पोलिसांनी नाल्यातून महिलेचा मृतदेह बाहेर काढला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. संबंधित महिलेचं डोकं आणि हात शोधण्यासाठी पोलीस बरेच प्रयत्न करत आहेत आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासले जात आहेत. मात्र अद्याप कोणताच पुरावा हाती लागला नाही.
हे ही वाचा: कोरेगाव जमीन प्रकरणी अमेडिया कंपनीविरोधात गुन्हा, पण FIR मध्ये पार्थ पवारांचं नाव नाही! नेमकी क्रोनोलॅाजी समजून घ्या!
पोलिसांचा संशय
अतिशय निर्घृणपणे महिलेची हत्या करण्यात आल्याने अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पीडितेच्या पतीने किंवा तिच्या प्रियकराने तिचा खून केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच, पुरावे मिटवण्यासाठी आरोपीने महिलेचं डोकं आणि हात कापून टाकल्याचं देखील मानलं जात आहे. महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर, पोलिसांचं एक पथक घटनास्थळवरील आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. महिलेची दुसऱ्या ठिकाणी हत्या करण्यात आली आणि नंतर, मृतदेह नाल्यात टाकला असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे.










