Navi Mumbai Crime : धक्कादायक! छातीवर, गृप्तांगावर गंभीर जखमा करून संपवलं, 22 वर्षीय तरुणीची कुणी केली क्रूर हत्या?

मुंबई तक

ADVERTISEMENT

 navi mumbai girl murder 22 year old girl brutal killing in uran shocking crime story
नवी मुंबईच्या उरणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एका 22 वर्षीय तरूणीच क्रूर हत्या

point

चेहऱ्यावर आणि गुप्तांगावर जखमा आढळून आल्या

point

तरूणीची हत्या करून तिच्या मृतदेहाची विटंबना

Navi Mumbai Girl Murder : नवी मुंबईच्या उरणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 22 वर्षीय तरूणीच क्रूर हत्या करण्यात आली आहे. यशश्री शिंदे असे या मृत तरूणीचे नाव आहे. या घटनेत तरूणीच्या शरीराचे अवयव कापण्यात आले आहेत, चेहऱ्यावर आणि गुप्तांगावर जखमा आढळून आल्या आहेत.त्यामुळे तरूणीची हत्या करून तिच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली आहे. या घटनेने सध्या नवी मुंबई हादरली आहे. (navi mumbai girl murder 22 year old girl brutal killing in uran shocking crime story) 

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशश्री शिंदे तिच्या कुटुंबासह उरण येथे राहत होती आणि बेलापूरमधील एका कंपनीत काम करायची. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे यशश्री घरातून कामावर निघाली होती, मात्र ती परतलीच  नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तिला फोन लावायचा प्रयत्न केला, मात्र तिचा फोन लागला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तिची शोधा शोध सुरू केली,मात्र ती काही सापडली नाही. शेवटी कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठून यशश्री बेपत्ता झाल्याची तक्रार केली. या तक्रारीनंतर यशश्रीच्या तपासाला सुरूवात झाली. 

हे ही वाचा : Sharad Pawar : तणावमुक्त राहण्यासाठी काय करतात पवार?

पोलीस यशश्रीचा शोध घेत असतानाच त्यांना रेल्वे स्थानकाजवळीत झुडुपात विछिन्ह अवस्थेत मृतदेह आढळून आला. यानंतर कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. 

हे वाचलं का?

या घटनेत तरूणीच्या शरीराचे अवयव कापण्यात आले आहेत, चेहऱ्यावर आणि गुप्तांगावर जखमा आढळून आल्या आहेत.त्यामुळे तरूणीची हत्या करून तिच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली आहे. 

तरूणीच्या  शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या आलेल्या आहेत. वैद्यकीय चाचणीनंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले तर तेही कलम जोडले जाणार आहे. या प्रकरणात आरोपीचा शोध घेण्यासाठी सात पथके नेमण्यात आली असून आरोपीचा शोध सूरू आहे,असे पोलिसांनी सांगितले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Supriya Sule : ''बाबांपेक्षा बाळासाहेबांनीच माझ्या लग्नात...'', सुप्रिया सुळेंनी सांगितला किस्सा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT