Crime: शेजारणीवर बलात्कार, आरोपीच्या बायकोने तर पीडित महिलेसोबत केलं भयंकर कृत्य…
एका महिलेवर तिच्या शेजारीच राहणाऱ्या एका व्यक्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे. याशिवाय आरोपीच्या बायकोने पीडित महिलेला विष देऊन आत्महत्येस देखील प्रवृत्त केलं.
ADVERTISEMENT
UP Rape News: रामपूर: उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) रामपूरमध्ये बलात्कार (Rape) आणि आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या शेजाऱ्याने बंदुकीचा धाक दाखवत विधवा महिलेवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना रामपूरच्या कोतवाली भागातील आहे. बलात्काराच्या आरोपीने महिलेला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे बलात्कारानंतर आरोपीच्या पतीनेच पीडित महिलेला विष देऊ केलं. जे प्राशन केल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. (neighbor raped accused wife committed a terrible act with the victim woman uttar pradesh crime news)
ADVERTISEMENT
आरोपीच्या पत्नीने पीडित महिलेला दिलं विष
मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, बलात्काराच्या घटनेनंतर आरोपीच्या पत्नीने पीडितेला विष दिलं आणि पीडितेने झाल्या प्रकारानंतर बदनामीच्या भीतीने ते विष देखील प्राशन केले. जेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला तेव्हा पीडितेच्या भावाने तिला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेलं. मात्र, उपचारादरम्यान पीडित महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला अटक केली.
हे ही वाचा >> Wife Swapping : ‘तू माझ्या मित्रासोबत झोप, मी त्याच्या पत्नीसोबत…’, उच्चभ्रू सोसायटीतील घटना
पोलिसांनी कारवाई करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला स्वार परिसरातील रहिवासी होती. विधवा असल्याने ती आपल्या चार मुलांसह घरात एकटीच राहायची. दरम्यान, मृत महिलेच्या नातेवाईकांनीही पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही, त्यामुळे बहिणीला आपला जीव गमवावा लागला, असा आरोप पीडितेच्या भावाने केला आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> ‘तेव्हा दुतोंडी साप जहर का ओकत होते?’, फडणवीसांना शिवसेनेचा (UBT) सवाल
आश्चर्याची बाब म्हणजे बलात्काराच्या घटनेनंतर महिलेचे नातेवाईक तिला पोलीस ठाण्यात घेऊन गेले, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. कुटुंबीयांच्या आरोपांची चौकशी सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT