मुंबईतील बँक घोटाळा, 122 कोटींवर डल्ला.. मॅनेजर हितेश मेहताला अटक

मुंबई तक

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी हितेश मेहता याला 122 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

मुंबईतील बँक घोटाळा, 122 कोटींवर डल्ला
मुंबईतील बँक घोटाळा, 122 कोटींवर डल्ला
social share
google news

मुंबई: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील कथित अनियमिततेच्या चौकशीनंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) मुख्य आरोपी हितेश मेहता याला अटक केली आहे. (new india co operative bank
scam in mumbai rs 122 crores seized manager hitesh mehta arrested)

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील कथित अनियमिततेच्या चौकशीनंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) मुख्य आरोपी हितेश मेहता याला अटक करण्यात आहे. आर्थिक गुन्हे शाखेने हितेश मेहताला समन्स पाठवलं होतं. यानंतर हितेश EOW कार्यालयात पोहोचला. यावेळी पथकाने त्याची चौकशी केली. यानंतर हितेशला अटक करण्यात आली आहे.

मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर व्यवसाय बंदी लादल्यानंतर, रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी बँकेच्या कामकाजात गंभीर अनियमितता असल्याचे नमूद केले, बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले आणि तिच्या पुनरुज्जीवनासाठी प्रशासकाची नियुक्ती केली. सूत्रांच्या माहितीनुसार, बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी निधीचा गैरवापर केला, ज्यामुळे हे संकट निर्माण झाले. आरबीआयच्या निर्णयानंतर, चिंताग्रस्त ग्राहकांनी काल सकाळपासूनच त्यांचे पैसे काढण्याच्या आशेने बँक शाखांबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली, परंतु त्यांना बँकेच्या आवारात प्रवेश दिला गेला नाही.

हितेशवर दबाव कसा वाढला?

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे माजी महाव्यवस्थापक हितेश प्रवीणचंद मेहता यांच्यावर बँकेतून 122 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. असा आरोप आहे की जेव्हा ते महाव्यवस्थापक पदावर होते आणि दादर आणि गोरेगाव शाखांचे प्रभारी होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून हा घोटाळा केला. 

बँकेच्या मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी दादर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्यात हितेश व्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती सहभागी असू शकते, असा पोलिसांना संशय आहे. पुढील तपासासाठी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) सोपवण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, हा घोटाळा 2020 ते 2025 या काळात झाला. 

दादर पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 316 (5) आणि 61 (2) अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे.

आरबीआयने कठोर कारवाई केली

शुक्रवारी आरबीआयने बँकेचे संचालक मंडळ एका वर्षासाठी बरखास्त केले आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चे माजी मुख्य महाव्यवस्थापक श्रीकांत यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. याशिवाय, बँकेला मदत करण्यासाठी एक सल्लागार समिती देखील स्थापन करण्यात आली आहे, ज्यामध्ये एसबीआयचे माजी महाव्यवस्थापक रवींद्र सप्रा आणि चार्टर्ड अकाउंटंट अभिजित देशमुख यांचा समावेश आहे. बँकेतील कमकुवत प्रशासकीय मानकांमुळे ही कारवाई आवश्यक झाली असल्याचे आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरबीआयने केलेल्या 'स्पॉट इन्स्पेक्शन'नंतर बँकेच्या मुख्य अनुपालन अधिकाऱ्यांनी (सीसीओ) गुरुवारी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्ल्यू) तक्रार दाखल केली होती.

पैसे काढण्यावर आणि कर्ज घेण्यावर बंदी

गुरुवारी, आरबीआयने बँकेला नवीन कर्ज देण्यास आणि ठेवी काढण्यास बंदी घातली होती. हे निर्बंध पुढील सहा महिने लागू राहतील आणि त्यांचा आढावा घेतला जाईल. आरबीआयने म्हटले आहे की बँकेची सध्याची तरलता लक्षात घेता, बँकेला बचत किंवा चालू खाते किंवा इतर कोणत्याही खात्यातून पैसे काढण्याची परवानगी दिली जाणार नाही.
 

हे वाचलं का?

    follow whatsapp