भाजप नेत्या सना खान प्रकरणात नवा ट्विस्ट, मोबाईल-लॅपटॉप सापडल्याने मोठी खळबळ

योगेश पांडे

ADVERTISEMENT

New twist bjp leader Sana Khan case mobile and laptop found in accused house
New twist bjp leader Sana Khan case mobile and laptop found in accused house
social share
google news

Sana Khan: भाजपच्या  अल्पसंख्यांक आघाडीच्या पदाधिकारी सना खान हत्या (Murder) झाल्यानंतर राज्यासह देशात मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता या प्रकरणी मोबाईल फोन आणि लॅपटॉप (Mobile and Laptop) जप्त करण्यात नागपूर पोलिसांना (Nagpur Police) यश आले आहे. जबलपूरमधून (Jabalpur) जप्त झालेला मोबाईल सना खान यांचेच असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

धागेदोरे सापडले

सना खान यांच्या मोबाईल आणि लॅपटॉप सापडल्याने आता आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यताही पोलिसांनी सांगितले. त्यातच सना खान यांचा मोबाईल आणि लॅपटॉप आरोपीच्या घरात आढळल्याने तपासला आणखी गती मिळण्याची शक्यताही पोलिसांनी सांगितले. आरोपी अमित उर्फ पप्पू साहू आणि त्याची आई राहत असलेली जागाही पोलिसांनी मिळाली आहे. हत्या प्रकरणात या दोन गोष्टी मिळाल्याने आणखी काही पुरावे आणि कारणं सापडतात का त्याचाही शोध पोलीस घेत आहेत.

हे ही वाचा >>Aditya Thackeray : ‘युवराज म्हणजे तळ्या काठी खोटे ध्यान…’ आशिष शेलारांचा ठाकरेंवर पलटवार

पॉलिग्राफिक टेस्टची मागणी

सना खानच्या हत्या झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकले होते. हत्येमागचं नेमकं कारण त्याचा शोध घेण्यासाठी सर्व पातळीवर पोलिसांकडून प्रयत्न केले जात होते. त्यासोबतच पोलिसांनी न्यायालयाकडे पॉलिग्राफिक टेस्टचीही आता पुन्हा एकदा मागणी केली आहे. कारण याआधीही न्यायालयाकडे ही मागणी केली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळली होती. त्यामुळे पोलिसांनी आता पुन्हा न्यायालयात धाव घेऊन पॉलिग्राफिक टेस्टची मागणी केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नेमकं काय प्रकरण ?

सना खान या नागपूरच्या असून त्या भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. सना खान यांनी मध्य प्रदेशातील जबलपूरमधील एका ढाब्यावर अमित उर्फ पप्पू साहूबरोबर भागिदारी केली होती. त्या भागिदारीबद्दलच त्या 1 ऑगस्ट रोजी अमितला भेटण्यासाठी त्या जबलपूरला गेल्या होत्या. तेव्हापासूनच त्या बेपत्ता होत्या. त्यानंतर सना खान बेपत्ता झाल्याची तक्रार नागपूरच्या मानकापूर पोलिसात देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना सनाचा साथीदार अमित साहूनेच हत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनीही त्याला ताब्यात घेऊन अटक केली होती. अमित उर्फ पप्पू साहूला जबलपूरमधूनच अटक केल्यानंतर त्याने सना खानच्या हत्येची कबूलीही दिली होती. त्यानंतर त्याच्या 5 साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> बापरे! उंदराने चावा घेतला, संतापलेल्या तरुणीने दाताने…

    follow whatsapp

    ADVERTISEMENT