13 हजार न्यूड फोटो, फोन हाती घेताच गर्लफ्रेंड हादरली, मग ..

मुंबई तक

ADVERTISEMENT

nude photo gallery 13 thousand nude photos in boyfriend mobile girlfriend gets mental shock
nude photo gallery 13 thousand nude photos in boyfriend mobile girlfriend gets mental shock
social share
google news

Cyber Crime : तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्य माणसांचे आयुष्य सहजसुंद झाले आहे, पण दुसरीकडे तंत्रज्ञानामुळे (Technology) अडचणीतही प्रचंड वाढ झाली आहे हे नाकारता येत नाही. कारण आताच एक प्रकरण ताजे प्रकरण घडलं आहे. भारताची सिलिकॉन व्हॅली (Silicon Valley) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूमध्ये (Bangalore) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बेंगळुरूमधील एका महिलेला तिच्या प्रियकराच्या मोबाईलच्या फोटो गॅलरीमध्ये (Nude Photo Gallery) तिचे अनेक फोटो नको त्या अवस्थेतील तिला दिसून आले. प्रियकराचा मोबाईल तिने तपासला असता तिला हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

बीपीओ सेंटर हादरले

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार 22 वर्षाची एक युवती एका बीपीओ सेंटरमध्ये काम करते. तिच्याच ऑफिसमधील आदित्य संतोष हा तिचा बॉयफ्रेंड आहे. ही दोघं रिलेशनशिपमध्ये असताना आदित्य संतोष या युवकाने त्या युवतीचे काही नको त्या अवस्थेतील फोटो काढले होते. आदित्य आणि ती युवती जवळ जवळ चार महिने रिलेशनशिपमध्ये होती.

प्रियकराने गाठली हद्द

प्रियकराच्या मोबाईलच्या फोटो गॅलरीमधील आपले फोटो ती युवती डिलीट करणार होती. त्यासाठी त्याच्या न कळत प्रियकराचा तिने मोबाईल घेतला. त्यानंतर मोबाईल तपासला असता तिच्या पायाखालची जमिनच हादरली. कारण प्रियकराच्या मोबाईलमध्ये तिच्याबरोबरच इतर महिलांचेही 13 हजार नग्न फोटो तिला पाहायला मिळाली. ही धक्कादायक माहिती तिला समजल्यानंतर मात्र काही क्षणात तिने त्याच्यासोबतचे संबंध तोडून टाकले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Dombivali Crime : दगडाने ठेचलं डोकं, मित्रांनीच संपवलं; हत्येचे कारण तपासातून आलं समोर

न्यूड फोटोंची गॅलरी

प्रियकराच्या मोबाईलमध्ये आपल्या फोटोबरोबरच इतर महिलांचेही 13 हजार नग्न फोटो असल्याचे उघड झाल्यानंतर युवतीने या घटनेची माहिती बीपीओ सेंटरच्या एचआरला आधी सांगितली. कारण कार्यालयातील इतर महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते तिला महत्वाचे वाटले होते. ज्यावेळी तिला 13 हजार फोटोंची माहिती मिळाली तेव्हा तिला वाटले की, हे सर्व फोटो त्याने मॉर्फ केले असतील मात्र सत्य समजल्यानंतर तिला आणखी मोठा धक्का बसला. त्यानंतर कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्याकडे हे प्रकरण गेल्यानंतर मात्र त्यांनी या प्रकरणी पोलिसात त्या युवकाविरोधात गुन्हा दाखल केला.

प्रेयसीला मानसिक धक्का

बीपीओ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा इतर महिलांवर परिणाम होऊ शकतो. मात्र या प्रकरणात ऑफिसमधील दुसऱ्या कोणत्याही महिलेचा यामध्ये समावेश नाही. मात्र त्याने असं का केलं याचा अजून थांगपत्ता लागला नाही. हे फोटो त्याने व्हायरल केले असते तर मात्र त्याच्या प्रेयसीला मोठा मानसिक धक्का बसला असता. त्यामुळे कंपनीने त्याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करुन त्याला आता अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

ब्लॅकमेल प्रकरणाचा तपास

पोलिसांनी सांगितले की, मोबाईलमध्ये त्याने 13 हजार फोटो का सेव्ह केले होते. त्याची माहिती काढण्यासाठी आता पोलिसांना वेळ लागणार आहे. यामधील काही फोटो मॉर्फ केले आहेत की ओरिजनल आहेत तेही तपासावे लागणार आहे. तसेच या फोटोच्या माध्यमातून त्याने कोणत्या महिलांना ब्लॅकमेल केले आहे का त्याचाही तपास सध्या सुरु असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> लोखंडी रॉडनं मित्राचं डोकं फोडलं, पोलिसांनी सांगितलं थरकाप उडवणारं हत्याकांड

    follow whatsapp

    ADVERTISEMENT