पुणे : पत्नीसह दोन मुलांना संपवलं अन् डॉक्टरने केली आत्महत्या, कारण…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Pune latest Crime news : in daund city doctor killed committed suicide after killing wife and 2 child
Pune latest Crime news : in daund city doctor killed committed suicide after killing wife and 2 child
social share
google news

Pune Crime News : दर्शना पवार हत्या प्रकरणाने पुणे चर्चेत असतानाच आता जिल्ह्यातील दौंड तालुक्यात भयंकर हत्याकांड समोर आलं आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलांचा खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. पत्नी शिक्षिका होती, तर दोन्ही मुले अल्पवयीन होती. या घटनेने दौंड शहरात खळबळ उडाली आहे.

डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (वय 42) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. तर पत्नी पल्लवी दिवेकर (वय 39), आदिवत अतुल दिवेकर (वय 9), वेदांती अतुल दिवेकर (वय 6) अशी खून करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

दिवसभर घराचा दरवाजा बंद अन् शंकेची पाल चुकचुकली

डॉ. अतुल दिवेकर हे त्यांच्या कुटुंबीसह दौंड शहरातील वरवंड परिसरातील चैत्राली सोसायटीमध्ये राहायला होते. डॉ. दिवेकर पशुवैद्यकीय तज्ज्ञ आहेत. तर त्यांची पत्नी एका शाळेत शिक्षका म्हणून कार्यरत होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे असलेल्या महत्त्वाच्या पदावरच राष्ट्रवादीचा ‘डोळा’!

मंगळवारी (20 जून) दिवसभर दिवेकर कुटुंबीयांच्या घराचा दरवाजा बंदच होता. घरात काही हालचाल नसल्याने त्यांच्या शेजाऱ्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला,पण आतून कुणीही प्रतिसाद दिला नाही. म्हणून त्यांनी दरवाजा उघडला आणि सगळ्यांना धक्काच बसला.

दिवेकर गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर…

शेजाऱ्यांनी दरवाजा उघडल्यानंतर डॉ. अतुल दिवेकर हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. शेजारीच खाली त्यांच्या पत्नी पल्लवी दिवेकर यांचा मृतदेह पडलेला होता. त्यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले.

ADVERTISEMENT

मुलांचे मृतदेह फेकले विहिरीत

शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती दौंड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी डॉ. दिवेकर यांनी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांनी मिळाली असून, त्यात त्यांनी डॉ. दिवेकर यांनी लिहिलेलं आहे की, ‘मी आत्महत्या करत असून, पत्नी आणि दोन लहान मुलांचा खून केला आहे. मुलांचे मृतदेह शेजारी असलेल्या विहिरीत टाकून दिले आहेत.’

ADVERTISEMENT

हेही वाचा >> बंड यशस्वी झालं नसतं तर शिंदे डोक्यात गोळी झाडून घेणार होते: दीपक केसरकर

मुलांचे मृतदेह विहिरीत टाकल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी चैत्राली पार्क परिसरात असलेल्या विहिरीत पाहणी केली. पाणी जास्त असल्याने मुलाचे मृतदेह दिसले नाही, त्यामुळे पोलिसांनी मोटारीने पाणी उपसण्याचा निर्णय घेतला. रात्री उशिरापर्यंत पाणी उपसण्याचे काम सुरूच होते. दरम्यान, डॉ. अतुल दिवेकर यांनी कौटुंबीक वादातून पत्नी, दोन मुलांची हत्या करून आत्महत्या केली असावी, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT