Pune Crime : आवडतं Gift दिलं नाही म्हणून बायकोने… पुण्यातील निखिलच्या हत्येची Inside Story

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

pune crime wife renuka khanna killed husband nikhil khanna murder story
pune crime wife renuka khanna killed husband nikhil khanna murder story
social share
google news

Pune Crime Renuka Khanna Killed Nikhil Khanna : पुण्यात काही दिवसापुर्वीच बर्थडे गिफ्ट न दिल्याने एका पत्नीने तिच्या नवऱ्याची हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेत बायकोने नवऱ्याच्या नाकावर ठोसा मारून त्याची हत्या केल्याचे समोर आले होते. निखिल खन्ना (Nikhil khanna) असे या उद्योगपतीचे नाव होते. प्राथमिक माहितीनुसार, निखिल यांच्या नाकात रक्त जमल्याने त्यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली होती. आता या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. कारण निखिल खन्ना यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. हा पोस्टमार्टम रिपोर्ट या हत्येला वळण देणारा ठरणार आहे. त्यामुळे या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आहे? आणि या हत्येची इनसाईड स्टोरी काय आहे? हे जाणून घेऊयात. (pune crime wife renuka khanna killed husband nikhil khanna murder story)

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय?

निखिल खन्ना यांच्या नाकाला फ्रॅक्चर झाले होते आणि जमिनीवर बेशुद्ध पडल्यानंतर खुप रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सुरुवातीला पोलिसांनी दिली होती. यानंतर आता निखिल खन्ना यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये निखिल खन्ना यांच्या मृत्यूची वेगळीच थिअरी समोर आली आहे.

हे ही वाचा : Deepak Kesarkar अचानक का गेले नारायण राणेंच्या घरी? ‘त्या’ बॅगेतून राणेंना काय दिलं?

चेहऱ्यावर मार लागल्याने तो जमिनीवर पडला असावा व त्याचे डोके जमिनीवर आदळले असावे, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. नाकावर झालेला हल्ला हा ठोसा होता की जड शस्त्राने केलेला हल्ला याचा तपास पोलिस करणार असल्याचे वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी सांगितले आहे. त्यामुळे या घटनेत बायकोच्या ठोश्याने नव्हे तर इतर जड वस्तुने त्याची हत्या केल्याचे स्पष्ट होते आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अशी आहे लव्हस्टोरी

पुण्यातील वानवडी येथील गंगा सॅटेलाइट हाउसिंग सोसायटीत राहणारे निखिल खन्ना हे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या व्यवसायाशी संबंधित
उद्योग करतात. निखिल खन्ना यांचे वय 36 वर्षे होते. तर त्यांची पत्नी रेणुका खन्ना 38 वर्ष म्हणजे त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. दोघे अनेक वर्षापासून एकमेकाच्या प्रेमात होते. त्यानंतर 2017 मध्ये दोघांनी लग्न केले होते आणि ते पुण्यात स्थायिक झाले होते.

संपूर्ण घटनाक्रम काय?

निखिल खन्नाचे वडील पुष्पराज यांनी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निखिलने नोव्हेंबर 2017 मध्ये रेणुकासोबत लव्हमॅरेज केले होते. या लग्नाचा काही दिवसानंतर त्यांच्यात खडके उडायला लागली आणि भांडणास सुरूवात झाली. या भांडणात रेणूकाच अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींवरही भांडायची. यावर दोघांना अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला होता,मात्र काहीच फरक पडला नसल्याचे पुष्पराज यांनी सांगितले. घरातील नोकरांना देखील हे सोडायचे नाही, त्यांच्याशी ही त्यांची भांडणे व्हायची. त्यामुळे आम्हाला घरात नोकर कामावर ठेवणे अवघड झाले होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : MLA Disqualification Case : 2019 चा ठराव, उद्धव ठाकरेंचा अधिकारच धोक्यात! सुनावणीत काय झालं?

दरम्यान 18 सप्टेंबरला रेणूकाचा वाढदिवस होता. हा वाढदिवस रेणूकाला दुबईत साजरा करायचा होता. मात्र निखिल फारच कामात व्यस्त असल्याने त्यांना दुबईला जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे रेणूका खुप संतापली होती. यानंतर 5 नोव्हेंबरला दोघांच्या लग्नाचा वाढदिवस होता. दोघांनी लग्नाचा वाढदिवस तर साजरा केला, पण निखिलने तिला तिच्या आवडीनुसार कोणतेही गिफ्ट न दिले नव्हते. त्यामुळे ती खुप नाराज होती. त्यावेळी रेणुकाने निखिलला मारहाण केली आणि भांडण शांत झालं.

ADVERTISEMENT

वडील पुष्पराज यांनी पुढे सांगितले की, खरंतर रेणुका आपल्या भाचीच्या वाढदिवसासाठी दिल्लीला जाण्याचा विचार करत होती. रेणुकाला विमानाने दिल्लीला जायचे होते. पण निखिल गोंधळला होता, आणि त्याला तिकीट काढता आले नाही. यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादातून मारामारी झासी आणि रेणूकाने निखिलला इतका जोराचा धक्का दिला की त्याचा मृत्यू झाला.

यानंतर रेणूकाने मला फोन करून घरी लवकर येण्यास सांगितले. मी त्याच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये असल्यावर तिचा आणखीण एक फोन आला आणि तिने म्ह्टले, लवकर या बाबा, खुप गरजेचे आहे.जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा तो घरात नग्न अवस्थेत पडला होता. त्याच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता. यानंतर त्याला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. पण काहीच हालचाल झाली नाही. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT