एग्जिट पोल

Pune Crime: पुण्यात नको ते घडलं, 23 वर्षीय तरूणाचा 85 वर्षाच्या वृद्ध महिलेवर बलात्कार

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्याच्या हिंजवडी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना

point

85 वर्षांच्या महिलेवर बलात्कार

point

बलात्कार करणाऱ्या 23 वर्षीय आरोपीला अटक

Pune Hinjewadi Crime News : पुण्याच्या हिंजवडी परिसरातील एका सोसायटीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आयटी हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंजवडीतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये 85 वर्षांच्या महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. बलात्कार करणारा आरोपी 23 वर्षांचा आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी (25 सप्टेंबर) संध्याकाळी 6.30 च्या सुमारास घडली. नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घेऊयात. (Pune hinjewadi Crime news 85 years old woman raped on building floor by 23 year old electrician)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 85 वर्षीय महिला पाचव्या मजल्यावर राहते. संध्याकाळी 6.30 च्या सुमारास ती आपल्या फ्लॅटच्या समोर असलेल्या मजल्यावरच फेरफटका मारत होती. यावेळी एका ठिकाणी इलेक्ट्रिशियनचे काम करण्यासाठी 23 वर्षीय तरूण आला होता. पाचव्या मजल्यावर आल्यानंतर वासनांध आरोपीने महिला एकटीच फिरत असल्याचं पाहिलं आणि संधी साधली. महिलेचं तोंड दाबून आरोपीने तिला जिन्यावरून फरफट नेलं.

हेही वाचा : Maharashtra weather: काळजी घ्या! राज्यात पावसाचा धुमाकूळ, 'या' जिल्ह्यांना धोक्याचा इशारा!

सहाव्या आणि सातव्या मजल्याच्या जिन्यातील मोकळ्या जागेत नेऊन आरोपीने पीडित महिलेवर बलात्कार केला. त्याचबरोबर जेव्हा तिने यासाठी प्रतिकार करत आरडाओरडा केला त्यावेळी आरोपीने तिला गळा दाबून मारहाणही केली. त्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पीडित 85 वर्षीय महिलेने हा घृणास्पद प्रकार घरी जाऊन सांगितला. या प्रकरणी पिडीतेच्या 57 वर्षीय मुलीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी ओम जयचंद पुरी (वय 23, सध्या रा. साखरे वस्ती, मुळ रा. धाराशिव ) याला काही तासांतच पोलिसांनी आरोपीला अटक केली.

हेही वाचा : Urmila Matondkar Divorce: उर्मिला मातोंडकर घटस्फोट घेणार? 8 वर्षानंतर पती मोहसीनसोबत काय बिनसलं?

आरोपीला अटक करण्याच्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत आढळला. त्याने हे काम दारूच्या नशेत केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला आता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT