Urmila Matondkar Divorce: चर्चा होती अभिषेक-ऐश्वर्याची! बातमी आली उर्मिला मातोंडकरची
Urmila Matondkar Files For Divorce : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. उर्मिला 8 वर्षांच्या वैवाहीक संसारानंतर तिच्या पतीसोबत घटस्फोट घेणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
उर्मिला मातोंडकर नवरा मोहसीनसोबत घेणार घटस्फोट?
8 वर्षांच्या संसारानंतर नेमकं काय घडलं?
उर्मिला आणि तिचा पती मोहसीन विभक्त होणार?
Urmila Matondkar Files For Divorce : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. उर्मिला 8 वर्षांच्या वैवाहीक संसारानंतर तिच्या पती मोहसीन अख्तर मीर घटस्फोट घेणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. सूत्रांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला आणि तिचा पती मोहसीन विभक्त होत आहेत. उर्मिलाला तिच्या कामावर आणि फिल्मी करिअरवर फोकस करायचं आहे. बातमी अपडेट होत आहे. (Big news has come regarding Bollywood actress Urmila Matondkar. There is strong talk that Urmila will divorce her husband after 8 years of marriage)
ADVERTISEMENT
उर्मिला पती मोहसीनसोबत घेणार घटस्फोट?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला आणि तिचा पती मोहसीन गेल्या काही दिवसांपासून एकत्र राहत नाहीत. याबाबत दोघांनीही कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. उर्मिलाने मोहसीन अख्तर मीरसोबत 2016 मध्ये लग्नगाठ बांधली होती. डिझायनर मनीष मल्होत्रामुळे दोघांचीही ओळख झाली होती. मनीष दोघांचाही कॉमन फ्रेंड आहे.
हे ही वाचा >> Maharashtra weather: काळजी घ्या! राज्यात पावसाचा धुमाकूळ, 'या' जिल्ह्यांना धोक्याचा इशारा!
मुंबई न्यायालयाच्या एका सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांना सांगितलं की, उर्मिलाने पती मोहसीनसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला आहे. त्यांनी न्यायालयत घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला आहे. ते घटस्फोट का घेत आहेत, यामागचं कारण अद्यापही समोर आलं नाहीय. हा घटस्फोट दोघांच्या सहमतीने होत नाहीय, असंही बोललं जात आहे. घटस्फोटाच्या अफवांबाबत कोणतंही सत्य समोर आलं नाहीय.
हे वाचलं का?
उर्मिलाने मोहसीनसोबत इंटीमेट सेरेमनीमध्ये लग्न केलं होतं. या दोघांच्या लग्नाच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. दोघांच्या वयामध्ये 10 वर्षांचं अंतर असल्याने अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली होती. मागील 8 वर्षांपासून उर्मिला मोहसीनसोबत होती. परंतु, ते सार्वजनीक जीवनात प्रकाशझोतात आले नाहीत.
हे ही वाचा >> Horoscope In Marathi : वृषभ राशीच्या लोकांनी राजकारणात अजिबात करु नका एन्ट्री! कर्क राशीला मिळेल पैसाच पैसा? तुमचं भविष्य काय?
कोण आहेत मोहसिन अख्तर मीर?
मोहसिन अख्तर मीर काश्मीरचे उद्योगपती आणि मॉडेल आहेत. 21 वर्षांचे असताना ते काश्मीरहून मुंबईला आले होते. बॉलिवूडमध्ये काम करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. 2009 मध्ये आलेला इट्स अ मेन्स वर्ल्ड चित्रपटातून त्यांनी डेब्यू केला. त्यानंतर त्यांनी लक बाय चान्स, मुंबई मस्त कलंदर आणि बीए पाससारख्या चित्रपटात काम केलं. त्यानंतर त्यांनी अभिनय सोडून उद्योग सुरु केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT