Maharashtra weather: काळजी घ्या! राज्यात पावसाचा धुमाकूळ, 'या' जिल्ह्यांना धोक्याचा इशारा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला

point

मुंबईसह 'या' जिल्ह्यांना IMD चा महत्त्वाचा इशारा 

point

राज्यातील काही जिह्यांना ‘ऑरेंज/यलो अलर्ट’!

Mumbai Weather Forecast Today :  राज्यातील बहुतांशी भागात मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप पाहायला मिळाली. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसल्या, अशातच आता राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढताना दिसत आहे. हवामान विभागाने  महाराष्ट्रामध्ये मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच आज (25 सप्टेंबर) काही भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आलं आहे. तुमच्या राज्यात पावसाची स्थिती कशी असेल सविस्तर जाणून घेऊयात. (maharashtra Weather Forecast heavy rainfall today 25 September 2024 IMD alert to these districts mumbai pune know weather report)

नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीची वाटचाल सुरू असतानाच राज्यात परतीचा पाऊस सक्रिय झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज पावसाचा जोर कायम राहणार असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, रायगड आणि पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा : Ladki Bahin Yojana: ठरलं 4500 रुपये मिळणार; सरकार उद्याच बँकांना पाठवणार पैसे, पण...

मुंबईसह 'या' जिल्ह्यांना IMD चा महत्त्वाचा इशारा 

मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे थोडा दिलासा मिळालाय. या परतीच्या पावसाचा जोर आणखी वाढणार असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार बरसेल असा अलर्ट IMD कडून जारी करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज्यातील काही जिह्यांना ‘ऑरेंज/यलो अलर्ट’!

मुंबईसह विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशीव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हेही वाचा : Horoscope In Marathi : वृषभ राशीच्या लोकांनी राजकारणात अजिबात करु नका एन्ट्री! कर्क राशीला मिळेल पैसाच पैसा? तुमचं भविष्य काय?

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT