Ladki Bahin Yojana: ठरलं 4500 रुपये मिळणार; सरकार उद्याच बँकांना पाठवणार पैसे, पण...
Ladki Bahin Yojana Third Installment Date : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप होणार आहे. त्यामुळे बँकांकडे आता योजनेचे पैसे आले आहेत. आता बँका हळूहळु पात्र महिलांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे हस्तांतर करणार आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सरकार उद्याच बँकांना पाठवणार पैसे
महिलांच्या खात्यात डीबीटीद्वारे पैसे पोहोचणार
बँक खातं तपासायला सुरूवात करा
Ladki Bahin Yojana Third Installment Date : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. त्यामुळे या दिवसाची महिला आतुरतेने वाट पाहातायत. त्यात आता सरकार योजनेचे पैसे उद्याच बँकेत पाठवणार आहे.त्यानंतर बँक (Bank) उद्यापासून हळूहळू हे पैसे महिलांच्या डीबीटी (DBT Transfer) करायाला सुरूवात करणार आहे. त्यामुळे महिलांनो उद्यापासून बँक खाते तपासायाला सुरुवात करा. (ladki bahin yojana scheme third installment money reach bank account women arew waiting for installement)
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप होणार आहे. त्यामुळे बँकांकडे आता योजनेचे पैसे आले आहेत. आता बँका हळूहळु पात्र महिलांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे हस्तांतर करणार आहे. त्यामुळे महिलांनी त्याच्या मोबाईलवरील मेसेज आणि बँक खाते तपासायला सुरूवात करा.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : महिलांनो, 29 सप्टेंबरआधी 'ही' गोष्ट करून घ्या, नाहीतर 4500 रूपये विसरा
कुणाला 4500 रूपये मिळणार?
आदिती तटकरे यांनी यावेळी तिसऱ्या हप्त्यात नेमका कुणाला लाभ मिळणार आहे? याची देखील माहिती दिली आहे. तिसऱ्या हप्त्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटीनिमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर जे अर्ज 24 ऑगस्टनंतर छाननी करून झाले आहेत. आणि सप्टेंबर महिन्यात 20 ते 25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील त्यांनी लाभ डीबीटीच्या माध्यमातून लाभ वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
हे वाचलं का?
'या' महिलांच्या खात्यात 1500 येणार
दरम्यान ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे. त्याच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहे. आणि ज्या महिलांना दोन्ही टप्प्यात लाभ मिळालेले नाही आहे, त्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा लाभ वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : तिसरा हप्ता लवकरच येणार खात्यात, पण 'या' महिलांना एकही रूपया मिळणार नाही
'इतक्या' महिलांनी घेतला योजनेचा लाभ
''मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला'', अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
ADVERTISEMENT
''सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जांची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा'', असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT