"डिजीटल अरेस्ट" करणारे पुण्यातच सापडले, खराडीमध्ये मोठी कारवाई, 123 जण ताब्यात, हादरवून टाकणारी माहिती समोर

मुंबई तक

पोलिसांनी घटनास्थळावरून 41 मोबाइल फोन आणि 62 लॅपटॉप जप्त केले आहेत. फसवणुकीसाठी याच साहित्याचा वापर होत होता.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हॅलो... तुम्हाला डिजीटली अटक करण्यात आलीये!

point

अशा फोनमुळे अनेकांची फसवणूक

point

फोन करणारे महाभाग आता गजाआड

Pune Cyber Crime News : "हॅलो... तुम्हाला डिजीटल अरेस्ट केलंय!" असं म्हणून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करणारे फोन मागच्या काळात अनेकांना आलेत. सहसा बिहारच्या जामतारामधूनच असे फोन येत असल्याचं आपल्याल वाटतं. विशेषत: उत्तर भारतातील काही राज्यातून हे सगळे कामं केले जातात. मात्र, पुण्यात झालेल्या एका कारवाईने सगळेच हादरलेत. पुणे पोलिसांनी खराडी येथील प्राइड आयकॉन इमारतीच्या नवव्या मजल्यावर चालणाऱ्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईमध्ये भयंकर प्रकार समोर आलाय.

हे ही वाचा >> एक्सप्रेस वेवर महिलेला वस्त्रहिन करून नेत्याचे खुलेआम शारीरिक संबंध, सगळा प्रकार CCTV मध्ये कैद 

केंद्रीय गृह मंत्रालयाला मिळालेल्या आंतरराष्ट्रीय तक्रारीच्या आधारे पुणे सायबर पोलिस, क्राइम ब्रँच आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे या कॉल सेंटरवर कारवाई केली. या छाप्यात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन जण फरार आहेत. तसेच, कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या 123 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले की, या कॉल सेंटरमधून परदेशी नागरिकांना लक्ष्य करत होते. आरोपी ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीद्वारे पैसे उकळत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून 41 मोबाइल फोन आणि 62 लॅपटॉप जप्त केले आहेत. फसवणुकीसाठी याच साहित्याचा वापर होत होता.

हे ही वाचा >> सख्ख्या आईसोबत मुलाचे अनैतिक संबंध, 9 वर्षाच्या मुलीने 'नको त्या अवस्थेत' पाहिलं अन् पुढे घडलं भयंकर!

सूत्रांनुसार, अटक केलेले आरोपी प्रामुख्यानं गुजरातचे रहिवासी असून काहींचा महाराष्ट्राशी संबंध असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा मास्टरमाइंड करन शेखावत असल्याचं समोर आलं आहे. ‘मॅग्नेटल बीपीएल अँड कन्सल्टन्सी’ नावाने हे कॉल सेंटर गेल्या तीन महिन्यांपासून कार्यरत होते.
सध्या सर्व 123 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे. पोलिस या आंतरराष्ट्रीय फसवणूक टोळीतील सक्रिय सहभागींचा शोध घेत आहेत. या कारवाईमुळे पुणे पोलिसांनी सायबर गुन्हेगारीविरुद्ध मोठे यश मिळवलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp