Pune Accident: पोराच्या रक्तात दारू सापडू नये म्हणून आईने दिलं ब्लड सॅम्पल, अवघं अग्रवाल कुटुंबच...
porsche car accident : पुण्यात झालेल्या पोर्श कार अपघातात नवनवीन खुलासे होत आहेत. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे सॅम्पल त्याच्या आईच्या रक्ताच्या सॅम्पलशी बदलण्यात आल्याचे आता पोलीस तपासात उघड झाले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी डॉ. तावरेचा दबाव- डॉ. श्रीहरी हळनोर
आमदारांच्या शिफारशीवरून डॉ. तावरेची नियुक्ती
आरोपीचे वडील आणि डॉक्टर यांच्यात 14 कॉल
पुणे : Pune Porsche Car Accident New Update : पुण्यात (Pune) झालेल्या पोर्श कार अपघातात नवनवीन खुलासे होत आहेत. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे सॅम्पल त्याच्या आईच्या रक्ताच्या सॅम्पलशी बदलण्यात आल्याचे आता पोलीस तपासात उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल हिने पुण्यातील ससून जनरल हॉस्पिटलमध्ये तिचे ब्लड सॅम्पल दिले होते. त्यावेळी ती सुद्धा रूग्णालयात उपस्थित होती. (pune porsche car accident drunk minor accused blood sample swapped with his mother in sasson hospital)
ADVERTISEMENT
ब्लड सॅम्पलची हेराफेरी ससून रूग्णालयातील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली होती. ही फसवणूक उघडकीस आल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांना निलंबितही करण्यात आले आहे. तर आरोपी मुलाची आई शिवानी अग्रवाल या दोघांच्या अटकेनंतर फरार आहे. पोलीस तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा : 'भाजप-NDA महाराष्ट्रात 'एवढ्या' जागांवर हरणार'
ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी डॉ. तावरेचा दबाव- डॉ. श्रीहरी हळनोर
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाच्या मुलाने 18 मे च्या मध्यरात्री एका रेस्टॉरंट-क्लबमध्ये भरपूर मद्यपान केले होते. यानंतर त्याने भरधाव वेगात पोर्श कार चालवली आणि एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन इंजिनीअर्सचा (तरूण, तरूणी) मृत्यू झाला. पोलिसांनी ज्यावेळी डॉ. श्रीहरी हळनोरची कसून चौकशी केली त्यावेळी त्याने मोठा खुलासा केला. हळनोरने दिलेल्या माहितीनुसार, 'अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी डॉ. तावरेंचा दबाव होता.'
हे वाचलं का?
आमदारांच्या शिफारशीवरून डॉ. तावरेची नियुक्ती
आमदार सुनील टिंगरे यांच्या शिफारशीनंतर अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलणारे आरोपी डॉ. तावरे यांची नियुक्ती करण्यात आल्याचा दावा रुग्णालयाचे डीन विनायक काळे यांनी केला आहे. शिफारशीनंतरच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी या नियुक्तीला मान्यता दिली. विनायक काळे म्हणाले, 'किडनी प्रत्यारोपण आणि औषध प्रकरणातील आरोपी असतानाही डॉ. तावरे यांची फॉरेन्सिक मेडिकल विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.'
हेही वाचा : मुंबईकरांचे होणार 'मेगा' हाल; मध्य रेल्वेवर 63 तासांपर्यंत जम्बो ब्लॉक!
आरोपीचे वडील आणि डॉक्टर यांच्यात 14 कॉल
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल घेण्यापूर्वी, वडील विशाल अग्रवाल, डॉ. तावरेशी व्हॉट्सॲप आणि फेसटाइम कॉल तसंच नॉर्मल कॉलद्वारे बोलला होता. दोघांमध्ये एकूण 14 कॉल्स झाले. हे कॉल 19 मे रोजी सकाळी 8.30 ते 10.40 दरम्यान झाले होते. त्यानंतर सकाळी 11 वाजता अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅमल घेण्यात आले होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा : दोन डॉक्टर निलंबित, डीनला सक्तीची रजा... पुणे अपघात प्रकरणात धडाधड कारवाई!
आरोपीला वाचवण्यासाठी पुराव्यांशी छेडछाड
फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (एफएसएल) अहवालात पहिल्या ब्लड सॅम्पलमध्ये अल्कोहोल आढळून आले नाही. शंका आल्यावर पुन्हा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये चाचणी करण्यात आली. येथील डीएनए चाचणीत हे ब्लड सॅम्पल दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे असल्याचे समोर आले. दुसऱ्या चाचणीचा अहवाल समोर आल्यानंतर ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आरोपीला वाचवण्यासाठी पुराव्यांशी छेडछाड केल्याचा संशय पोलिसांना आला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT