Pune Accident : मुलाला वाचवण्यासाठी केल्या 'या' गोष्टी; अग्रवालवर दाखल होणार दोन गुन्हे

रोहिणी ठोंबरे

Drunk and Drive Case of Pune : पुण्यात घडलेल्या पोर्श कार अपघातातील नवीन अपडेटनुसार, अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसंच या प्रकरणात आणखी मोठी अपडेट आली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

खोटी माहिती देत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

point

नेमकं खरं काय? ड्रायव्हरने स्वत: सांगितलं... 

point

व्हायरल रॅप व्हिडीओ मागील सत्य काय?

पुणे : Pune Porsche Car Accident : पुणे पोलिसांनी (Pune Police) ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. या प्रकरणातील ड्रायव्हरच्या भूमिकेवरही ते बोलले. पुण्यात घडलेल्या पोर्श कार अपघातातील नवीन अपडेटनुसार, अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. (Pune porsche car Accident Two cases will be filed against Vishal Agarwal for trying to destroy evidence to save accused minor son

खोटी माहिती देत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

पोलीस तपासात समोर आले आहे की, विशालने त्याच्या ड्रायव्हरला फोन केला होता. तू गाडी चालवत होता असं पोलिसांना सांग, त्याबदल्यात तुला बक्षिस मिळेल असं विशाल अग्रवालने ड्रायव्हरला सांगितल्याचं समोर आलं आहे. 

हेही वाचा : "मविआचा महायुतीला फटका बसेल"; शिंदेंच्या नेत्याचा अंदाज

ड्रायव्हरला खोटा जबाब देण्यास विशाल अग्रवालनेच भाग पाडले. त्यामुळे त्याच्यावर खोटी माहिती देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने दोन गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. विशालविरुद्ध कलम 201 अन्वये पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

यासोबतच आरटीओच्या तक्रारीनंतर विशालविरुद्ध कलम 420 अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कारण, पोलिसांना यापूर्वी पोर्श कारचे रजिस्ट्रेशन झाले होते असे सांगण्यात आले होते, पण कारचे रजिस्ट्रेशन नव्हते झाले, त्यांनी खोटी माहिती दिली होती. 

हे वाचलं का?

    follow whatsapp