Crime : दुधात विष मिसळलं अन्…, तीन सख्ख्या बहिणींचा आई-वडिलांनीच का घेतला जीव?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

punjab crime parent together murder three daughter in kanpur village jalandhar crime story
punjab crime parent together murder three daughter in kanpur village jalandhar crime story
social share
google news

Punjab Crime : सख्ख्या बहिणी घराशेजारी खेळता खेळता अचानक बेपत्ता झाल्या. या बेपत्ता तरूणीचा शोध सुरु असतानाच त्याचा मृतदेह सापडला. सुरूवातीला हा मृत्यू अपघाताने झाल्याचा बनाव रचला गेला. मात्र पोलिसांना या घटनेत कसून तपास करून धक्कादायक घटनेचा उलगडा केला. या हत्येचा उलगडा होताच पोलिसांना देखील धक्का बसला. कारण ज्या जन्मदात्या आई-वडिलांनी मुलींना जन्म दिला होता, त्यांनीच आता त्यांची हत्या केल्याचे उघड झाले आहे. या हत्याकांडाने सध्या शहर हादरलं आहे. (punjab crime parent together murder three daughter in kanpur village jalandhar crime story)

ADVERTISEMENT

पंजाबच्या (punjab) जालंधर (Jalandhar) येथील कानपूर (Kanpur) गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील रूम मालक सुरींदर सिंहने मृत तरूणीचे वडील सुशील मंडल यांच्या 3 मुली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीनंतर मंडल यांच्या घराशेजारी आणि गावात तीनही मुलींचा पोलिसांकडून शोध घेण्यात आला.

हे ही वाचा : मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच भाजपने ‘ओबीसी जागर यात्रा’ का काढली?

पोलिसांनी सुरुवातीला घराशेजारी तपास करून सुद्धा कोणताच सुगावा हाती लागत नाही. त्यामुळे पोलिसांनी सुशील मंडल यांची चौकशी केली. या चौकशीत कसून तपास केला असता वडील मंडल यांनी पोलिसांना एका ट्रकच्या शेजारी नेले. हा ट्रक उघडताच त्यामधील एका बॉक्समध्ये तीनही मुली मृतावस्थेत होत्या आणि त्यांच्या तोंडातून फेस येत होता. या घटनेची माहिती देताच सुशीलने मुली खेळत होत्या. यावेळी ट्रकमध्ये बंद झाल्या कारणाने गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे वाचलं का?

हा संपूर्ण घटनाक्रम पाहून पोलिसांना वडिलांवर आणखीणच संशय बळावला. त्यामुळे आणखीण कठोर पद्धतीने तपास केला असता, वडिलांनी मुलींच्या हत्येची कबुली दिली. बायकोने सकाळी दुधात विषारी पदार्थ मिसळून तीन्ही मुलींची हत्या केली त्यानंतर ट्रकमध्ये त्यांचा मृतदेह लपवला असे आरोपी वडिलांनी सांगितले. वडिलांनी ही संपूर्ण घटना सांगताच पोलिसांना देखील घाम फुटला.

हे ही वाचा :  Nanded Hospital : ‘तीन पक्ष ठणठणीत बाकी महाराष्ट्र…’; राज ठाकरे कडाडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपी दाम्पत्याची आर्थिक स्थिती बिकट होती. या कारणामुळे त्यांनी मुलींच्या हत्येचा कट रचला होता. आरोपी आई-वडिलांना या घटनेचा पश्चाताप होत आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपी आई-वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT