Crime: मुंबईतील वासनांध, धावत्या लोकलमध्ये विवाहित महिलेसोबत..

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

railway police handcuffed the lustful accused who molested a married woman in a dombivli ghatkopar local train mumbai crime
railway police handcuffed the lustful accused who molested a married woman in a dombivli ghatkopar local train mumbai crime
social share
google news

Crime डोंबिवली: डोंबिवली (Dombivli) ते घाटकोपर (Ghatkopar) दरम्यान धावत्या लोकलमध्ये (Local Train) एका विवाहितेची छेड करून पीडितेशी लगट करून तिचा विनयभंग (molested) करणाऱ्या नराधमाला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी 12 तासातच बेड्या ठोकल्या. हरिषकुमार सुदुला (वय 27 वर्ष) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (railway police handcuffed the lustful accused who molested a married woman in a dombivli ghatkopar local train mumbai crime)

ADVERTISEMENT

नेमकं प्रकरण काय?

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता घाटकोपर परिसरात पती आणि मुलांसह राहते. तर आरोपी सुदुला हा विक्रोळी पूर्व भागात असलेल्या टागोरनगरमध्ये राहतो. पीडित विवाहिता ही घाटकोपरहून डोंबिवलीमध्ये नातेवाईकाला भेटण्यासाठी पती आणि मुलांसह आली होती.

हे ही वाचा >> Crime : महिलेच्या डोक्यात वासनेचं भूत, पतीला पाजायची अंमली दूध; नंतर दिरासोबत…

तर आरोपी सदुला हा डोंबिवलीमध्ये कामानिमीत्त आला होता. त्यातच 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थनाकातून सीएसटीकडे जाणाऱ्या पाच नंबर फलाटावरुन जलद लोकलने जनरल डब्यात घाटकोपरपर्यत पीडित विवाहिता, पती आणि मुलांसह प्रवास करीत होती. त्याच वेळी आरोपी सुदुला हाही डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या त्याच जनरल डब्यातून प्रवास करत होता. पण डोंबिवली स्थानकातच डब्यात चढताना त्याने पीडितेची छेड काढली. त्यानंतर डोंबिवली ते घाटकोपर दरम्यान लोकलमधील गर्दीचा फायदा घेत, नराधमाने पीडितेशी लगट करून तिचा विनयभंगही केला.

हे वाचलं का?

दरम्यान, घाटकोपर रेल्वे स्थानकातही डब्यातून उतरताना त्याने छेड काढली अन् तिथून पळ काढला. मात्र, या घटनेनं पीडिता भयभीत झाली आणि घडलेला प्रसंग तिने आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर पीडित विवाहितेने 24 ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात जाऊन घेऊन घडेलला प्रकार सांगताच आरोपीविरोधात तक्रार नोंदवली.

हे ही वाचा >> Ambernath Crime: मेव्हण्याने भाऊजीचं गुप्तांगच कापलं, कोयत्याने निर्घृण हल्ला; नेमकी काय घडलं?

ज्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात भादंवि कलम 354, 354 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला. या संदर्भात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्याशी संपर्क साधला असता, गुन्हा दाखल होताच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी ओळख पटवली. त्यानंतर त्याला विक्रोळी भागातून डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी 12 तासाच्या आत अटक केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक डोंबिवली लोहमार्ग पोलीस करीत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT