बायकोचा अंड्याची पोळी बनवण्यास नकार, वैतागलेल्या पतीने….

मुंबई तक

ADVERTISEMENT

refuse to make egg fry angry husband attack wife
refuse to make egg fry angry husband attack wife
social share
google news

Husband attack wife case register on police station : बीड : पती-पत्नीमध्ये शुल्लक कारणावरून नेहमी वाद होत असतात. हे वाद काही दिवसांनी मिटतात. यामध्ये कोणाला मध्यस्थी शक्यतो करावी लागत नाही. मात्र बीडमध्ये (Beed) घडलेल्या या घटनेत शुल्लक कारणावरून सुरु झालेला हा वाद थेट पोलीस स्टेशनमध्ये (Police) पोहोचला होता. बायकोने अंड्याची पोळी बनवण्यास नकार दिल्याने संतापलेल्या नवऱ्याने (Husband) तिच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यामुळे या हल्ल्यानंतर बायकोने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची चर्चा संपूर्ण गावात रंगली आहे. (refuse to make egg fry angry husband attack wife case register on police station)

ADVERTISEMENT

पती-पत्नीमध्ये (Husband-Wife) नेहमीच वाद होत असतात. यात काय नवीन नाही. मात्र पहिल्यांदाच शुल्लक कारणावरून पती-पत्नीचा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. खरं तर या घटनेत झालं असे की, चक्क पत्नीने अंड्याची पोळी (Egg Fry) बनवून दिली नसल्याने चिडलेल्या पतीने तिला मारहाण केली होती. या मारहाणीनंतर पत्नीने पतीविरोधात पोलिस ठाण गाठलं होतं.

हे ही वाचा : शेजाऱ्याच्या घरात कुलरमध्ये सापडला मुलाचा मृतदेह, तारेने बांधलेले हात-पाय

अंबाजोगाई (Ambajogai) शहरामध्ये पतीने पत्नीला अंड्याची पोळी बनवायला सांगितली होती. मात्र पत्नीने पोळी बनवून देण्यास नकार दिला होता.त्यामुळे पत्नीने अंड्याची पोळी बनवून दिली नसल्याचा पतीला राग आला आणि त्याने पत्नीच्या डोक्यात लाकूड मारून तिला जखमी केले. पतीच्या या वागण्यामुळे शुल्लक कारणावरून सुरु झालेला वाद पोलीस ठाण्यात पोहोचला होता.

हे वाचलं का?

दरम्यान हा वाद इतका विकोपाला गेला होता की, चक्क पत्नीने नवऱ्याविरोधात पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पत्नीच्या तक्रारीनंतर पती विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात कलम ३२४,५०४,५०६ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान शुल्लक कारणावरून झालेला पती पत्नीचा वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

हे ही वाचा : CCTV: पुण्यात तरुणाने थेट महिलेच्या कानशिलात लगावली, उच्चभ्रू सोसायटीत काय घडलं?

याआधी देखील अशा घटना घडत असतात. याआधी एका घटनेत शुल्लक कारणावरून एका पतीने आपल्याच पत्नीचे कान उपटल्याची घटना समोर आली होती. या घटनेत पत्नीची अवस्था खुपच बिकट झाली होती. या प्रकरणी पिडीत महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेऊन पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. या घटनेची चर्चा खुप रंगली होती.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT