Mumbai Crime : अल्पवयीन मुलगी रिक्षात बसली अन् वासनांध चालकाने…धक्कादायक घटनेने शहर हादरलं

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

rickshaw driver tried to molesy a minor girl in rickshaw powai andheri crime story
rickshaw driver tried to molesy a minor girl in rickshaw powai andheri crime story
social share
google news

मुंबईत (Mumbai) पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कारण महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेत नाही. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर रिक्षाचालकाने लंगट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. या घटनेत अल्पवयीन मुलीने रिक्षावाल्याच्य़ा (Auto Driver) तावडीतून स्वत:ची कशी बशी सुटका करून पळ काढला होता. या घटनेने सध्या शहर हादरलं आहे. (rickshaw driver tried to molesy a minor girl in rickshaw powai andheri crime story)

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही खाजगी शिकवणीसाठी घराबाहेर पडली होती. ही शिकवणी आटोपल्यानंतर मुलगी घरी जायला निघाली होती. यासाठी मुलीने रिक्षा बोलावून त्यात प्रवास सुरु केला होता. या दरम्यान अल्पवयीन मुलगी एकटी असल्याचे पाहून रिक्षावाल्याचा मनात तिच्याबद्दल वाईट विचार येऊ लागले आणि त्याच्यातला वासनांध जागा झाला.

रिक्षाचालकाने मुलगी एकटी असल्याचे पाहून तिच्यासोबत अश्लील शेरेबाजी करायला सुरुवात केली. त्यानंतर तिच्याशी लंगट करण्याचा देखील प्रयत्न सुरु केला. रिक्षा रस्त्यावरून धावत असताना हा सर्व प्रकार सुरु होता. त्यामुळे अल्पवयीन मुलीला स्वत:ची सुटका देखील करता आली नाही. मात्र नंतर पुढे अल्पवयीन मुलीने रिक्षावाल्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून पळ काढला होता.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Crime: जेवणात दररोज द्यायचा विष…, जावयाने सासूला का संपवलं?

या घटनेनंतर अल्पवयीन मुलगी खूपच घाबरली होती. या घाबरलेल्या अवस्थेतच तिने घर गाठले आणि रिक्षात घडलेला संपूर्ण घटनाक्रम आई-वडिलांना सांगितला. या घटनेनंतर आई-वडिलांनी मुलीसह पवई पोलीस स्टेशन गाठून नराधम रिक्षाचालकाविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाविरोधात विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

अल्पवयीन मुलीसोबत दिवसाढवळ्या अतिप्रसंगाच्या घडलेल्या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ तरूणीला गाठून रिक्षा स्टँड गाठले आणि रिक्षावाल्याचा तपास सुरु केला. मात्र रिक्षा स्टँडवर आरोपी रिक्षाचालक सापडला नाही. शेवटी पोलिसांनी अल्पवयीन मुलीने ज्या मार्गाने प्रवास केला होता, तो पवई येथील हिरानंदानी ते मोरारजी नगर या मार्गावरील सीसीटीव्ही तपासायला सुरूवात केली. या तपासात पोलिसांना सीसीटीव्हीत रिक्षाचा नंबर सापडला. या नंबरवरून आरोपीची ओेळख पटवून पोलिसांनी घाटकोपर परिसरातून आरोपी रिक्षाचालकाला अटक केली. तसेच त्याची रिक्षा देखील ताब्यात घेतली. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Burari Rape Case : सैतानी कृत्ये! वडिलाचा मृत्यू… ‘मामा’ 4 महिने करत राहिला बलात्कार

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT