Sakshi Murder : स्नेहा, निक्की, श्रद्धा आणि निकिता; प्रियकरांच्या क्रूर कहाण्या
सनकी प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याच्या घटना दिल्ली-एनसीआरमध्ये प्रेमप्रकरणानंतर अनेकदा घडल्या आहेत.
ADVERTISEMENT

sakshi murdered by sahil : दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात साक्षीची निर्घृण हत्या करणाऱ्या साहिलला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून अटक करण्यात आली आहे. साहिलने रविवारी त्याच्या 16 वर्षीय अल्पवयीन गर्लफ्रेंड साक्षीची चाकूने वार करून हत्या केली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते. साहिलने साक्षीची किती क्रूरपणे हत्या केली, हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र, दिल्लीतील क्रौर्याची परिसीमा ओलांडणारी ही पहिलीच घटना नाही. सनकी प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याच्या घटना दिल्ली-एनसीआरमध्ये प्रेमप्रकरणानंतर अनेकदा घडल्या आहेत. त्यापैकी काही घटनांवर टाकलेली नजर.
18 मे 2023 : विद्यार्थी असलेल्या अनुजने ग्रेटर नोएडा येथील शिव नादर युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्येच स्नेहा चौरसिया या वर्गमैत्रिणीची गोळ्या झाडून हत्या केली, त्यानंतर त्याने वसतिगृहात जाऊन स्वत:वर गोळी झाडली. स्नेहाचे अनुजसोबत ब्रेकअप झाले होते, त्यामुळे तो संतापला आणि हत्या केल्याचं नंतर पोलीस तपासात समोर आलं.
हेही वाचा >> Balu Dhanorkar : …अन् त्या व्हायरल कॉलने काँग्रेसला महाराष्ट्रात दिला एकमेव खासदार
एप्रिल 2023 : दिल्लीतील मोलाडबंदमध्ये एका 17 वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. दोघे रिलेशनशिपमध्ये होते, मात्र काही काळापूर्वी तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. आरोपी प्रिन्सने तिच्यावर चाकूने अनेक वार केले होते.
निकीचा साहिलने घोटला गळा
फेब्रुवारी 2023 : साहिल गेहलोतने दिल्लीतील निगम बोध घाटाजवळ कारमध्ये झालेल्या वादाच्या वेळी डेटा केबलने निक्की यादवचा गळा दाबून खून केला. एवढेच नाही तर त्याने निकीचा मृतदेह समोरच्या सीटवर बसवला आणि सीट बेल्ट लावला आणि कश्मीरी गेट भागातून पश्चिम विहारमार्गे नजफगडमधील 50 किमी अंतरावर असलेल्या मित्रा गावात नेला. खरं तर, साहिलच्या कुटुंबीयांनी त्याचे लग्न ठरवले होते, ज्याची माहिती निकीला कळाली, ज्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता.










