बहिणीचे मावसभावासोबत प्रेमसंबंध, सख्ख्या भावाला पटलं नाही, अखेर...

मुंबई तक

एका भावाने आपल्या सख्ख्या बहिणीचा हत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून ही घटना घडली आहे. बहिणीचे प्रेमसंबंध त्याला मान्य नव्हते, त्यामुळे तो संतापला होता.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

बहिणीचे मावसभावासोबत प्रेमसंबंध

point

सख्ख्या भावाला पटलं नाही

point

अखेर...

Crime News : नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक आणि वेदनादायक घटना समोर आली आहे. एका भावाने आपल्याच 20 वर्षीय सख्ख्या बहिणीची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. पोलीस तपासात उघड झाले आहे कि, तरुणीला तिच्या मावसभावाशी विवाह करायचा होता, परंतु तिच्या भावाचा या प्रेमसंबंधांना तीव्र विरोध होता. हाच वाद अखेर इतक्या टोकाला गेला की भावाने बहिणीचा जीव घेतला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून, त्याच्या सांगण्यावरून हत्येसाठी वापरलेले बेकायदेशीर पिस्तूल आणि काडतूस जप्त केले आहे. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील ही घटना आहे.

मावसभावासोबत प्रेमसंबंध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्कान असे मृत तरुणीचे नाव असून तिचे तिच्या मावसभावासोबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू होते. त्या दोघांनाही एकमेकांसोबत निकाह करायचा होता. मात्र, तिच्या कुटुंबातील काही सदस्य आणि विशेषतः तिचा भाऊ शमी मोहम्मद या लग्नाच्या पूर्णपणे विरोधात होता. 11 जून रोजी याच कारणावरून भाऊ-बहिणीमध्ये जोरदार भांडण झाले होते. मुस्कान आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि तिने विवाह करण्याचा हट्ट सोडण्यास स्पष्ट नकार दिला. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी भावाने आपल्याच बहिणीच्या हत्येचा कट रचला.

हे ही वाचा : टँकर ड्रायव्हरसोबत प्रेम फुललं, 6 महिने लिव्ह-इनमध्ये अन् शेवटी..भयंकर घडलं!

बहिणीवर झाडली गोळी

ही थरारक घटना 12 जून रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्या दिवशी मुस्कान घरामध्ये खाटेवर झोपलेली होती. याच संधीचा फायदा उठवत शमी मोहम्मदने बेकायदेशीर पिस्तूल काढून बहिणीवर थेट गोळी झाडली. वर्मी घाव बसल्याने मुस्कानचा जागीच मृत्यू झाला. या क्रूर गुन्ह्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. काही वेळाने जेव्हा मुलीची आई घरी परतली, तेव्हा तिला मुलीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसला, ज्यामुळे तिला मोठा धक्का बसला. यानंतर गावच्या सरपंचांच्या माध्यमातून पोलिसांना माहिती देण्यात आली आणि पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

हे ही वाचा : पांढऱ्या पट्टीचा वाद गिरगावात मराठी मुलांनी काय दिला इशारा?

पोलिसांनी काय सांगितले?

पोलिसांनी सांगितले की, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वेगाने तपास चक्रं फिरवली आणि आरोपी भाऊ शमी मोहम्मद याला बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या कडक चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला हत्यार लपवलेल्या ठिकाणी नेले. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याला स्थानिक कब्रस्तानात नेऊन तिथून हत्येसाठी वापरलेले बेकायदेशीर पिस्तूल आणि काडतूस जप्त केले. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले शस्त्र ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली असून आरोपीविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात पाठवले आहे. या ऑनर किलिंगच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावात शोककळा पसरली आहे.
 

हे वाचलं का?