आर्यन खान प्रकरणात 25 कोटी खंडणीची मागणी, समीर वानखेडेंच्या घरात काय सापडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

sameer wankhede reaction on cbi filled corruption case and raid house
sameer wankhede reaction on cbi filled corruption case and raid house
social share
google news

Sameer Wankhede reaction on CBI Raid : आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)चे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयने 12 मे 2023 ला भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यानंतर सीबीआयने वानखडे यांच्या सबंधित 7 ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात सीबीआय़च्या हाती नेंमके काय पुरावे लागले आहेत? आणि या छाप्यावर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे? हे जाणून घेऊयात.(sameer wankhede reaction on cbi filled corruption case and raid house aryan khan ncb cruise drugs case)

प्रकरण काय?

समीन वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा आर्यन खान प्रकरणाशी संबंधित असल्याची माहिती आहे. या प्रकरणी सीबीआयने 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये समीर वानखडेसह दोन अधिकारी आणि दोन खाजगी व्यक्तींचा समावेश आहे. आर्यन खान प्रकरणात 25 लाख कोटीची खंडणी मांगण्यात आल्याचा आरोप आहे. या आरोप प्रकरणी हा गुन्हा दाखल असून तपास सुरु आहे.

हे ही वाचा : Neet च्या तयारीसाठी कोटात आले अन् जीवनच संपवलं, विद्यार्थ्यांसोबत घडलं काय?

समीर वानखेडे काय म्हणाले?

सीबीआयने टाकलेल्या छाप्यावर इंडिया टूडे आणि आज तकशी बोलताना समीर वानखेडे (Sameer Wankhede) म्हणाले की, सीबीआय़ने काल माझ्या घरावर छापा टाकला होता.या छाप्यात त्यांनी 12 तास तपास केला. य़ा तपासात त्यांच्या हाती 18 हजार रूपयांची रोकड आणि चार प्रॉपर्टीचे पेपरर्स लागले होती. ही संपूर्ण प्रॉपर्टी माझ्याकडे सर्विस जॉईन करण्यापुर्वी होती.मला देशभक्त असल्याची शिक्षा मिळाल्याचे समीर वानखडे सांगतात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सीबीआयने (CBI) माझ्या सासरच्या घरी देखील छापा टाकला होता. माझे सासू-सासरे खुप वृद्ध आहेत, 7 अधिकारी त्यांच्या घरी गेले होते. तसेच सीबीआयने अंधेरीच्या माझ्या वडिलांच्या घरी देखील छापा टाकला. 6 अधिकारी त्यांच्या घरी गेले होते. या ठिकाणी त्यांना काहीच सापडले नाही, असे वानखेडे यांनी सांगितले.

क्रुज ड्रग्ज प्रकरण काय?

मुंबईच्या कार्डेलिया क्रुजवर 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने रेड टाकली होती. एनसीबीला क्रुज शिपवर रेव पार्टी होत असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार आर्यन खान सह 19 लोकांना अटक करण्यात आली होती. पण छापा टाकताना फक्त 6 लोकांनाच ताब्य़ात घेतले होते. या प्रकरणात एका आरोपीला सोडून इतर सर्व आरोपी जामीनावर बाहेर होते. अटकेनंतर आर्यन खानला तीन आठवडे जेलमध्ये रहावे लागले होते. एसआयटी चौकशीनंतर आर्यनने 6 नोव्हेंबरला जामीन दिला होती. याच आठवड्यात समीर वानखेडे यांची बदली झाली होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : स्वस्तात आयफोन घेणं पडलं महागात, पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश

तपासात काय आलं समोर ?

एनसीबीचे डीडीजी संजय कुमार सिंह यांनी निवेदन जारी करून सांगितले की, आर्यन आणि मोहन व्यतिरीक्त सर्व आरोपींकडे ड्रग्ज आढळून आले होते. आता 14 जणांविरोधात NDPS कायद्याचा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरीत सहा जणांविरोधात पुराव्यांअभावी तक्रार नोंदवली जात नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT