Sanjay Raut : "बाबा रे..."; राऊतांनी जोडले हात, CM शिंदेंना काय दिल्या शुभेच्छा?
"तुमची इच्छा पूर्ण झाली ना... महाराष्ट्राची वाट लावण्याची. महाराष्ट्राला बदनाम करण्याची", असे म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे राजीनामा देण्याची मागणी केली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर संजय राऊत आक्रमक
मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची राऊतांनी केली मागणी
संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र
Sanjay Raut Abhishek ghosalkar Eknath Shinde : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक मागणीही केली.
ADVERTISEMENT
दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर विरोधकांकडून शिंदे सरकार टीका होत आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा देण्याची विनंती केली.
संजय राऊत शिंदेंना काय म्हणाले?
राऊत म्हणाले, "गुंडांनी गुंडासाठी चालवलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र सरकार, हे मी सांगतोय. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी, मंत्रालयात, इतकंच काय तर नागपूरच्या विधानभवनातही अनेक गुंड, गुन्हेगार, माफिया हे सातत्याने मुख्यमंत्री आणि त्यांच्या बाळ राजांना भेटत होते. आजही भेटतात."
हे वाचलं का?
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावरही राऊतांनी टीका केली. ते म्हणाले, "त्यांना महाराष्ट्राशी काही पडलेलंच नाही. कुणीतरी म्हटलं की आज मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. म्हणजे आज तिथे अजून शंभरेक गुंड येतील.फडणवीस दिल्लीला गेले आहेत, कशाकरता? नवीन सुपारी घ्यायला, महाराष्ट्रात खून करण्याची?", असा संतप्त सवाल राऊतांनी फडणवीसांना केला.
संजय राऊत पुढे म्हणाले, "एकदातरी ते या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर एकदा तरी बोलले आहेत का? कठोर कारवाई करू, कुणावर फक्त शिवसैनिकांवर? गुंडावर नाही. गुंड तुमचे कोण लागतात?", असा प्रश्न राऊत करत राऊतांनी फडणवीसांना घेरलं.
ADVERTISEMENT
महाराष्ट्राची वाट लावली... राऊतांची शिंदेंवर टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या बोर्ड-होर्डिंगबद्दल राऊत म्हणाले, "त्यातील अर्धे गुंडांचे आहेत. मी त्यांना शुभेच्छा इतक्याच देईन की बाबा रे दीड वर्ष भोगलं. महाराष्ट्राची वाट लावली... आता दूर व्हा. या माझ्या शुभेच्छा आहेत, महाराष्ट्रासाठी!"
ADVERTISEMENT
"झालं, तुमची इच्छा पूर्ण झाली ना... महाराष्ट्राची वाट लावण्याची. महाराष्ट्राला बदनाम करण्याची. महाराष्ट्राला खतम करण्याची. महाराष्ट्राच्या अस्मितेला चूड लावण्याची दिल्लीच्या मदतीने. झालं आता ना? खोके जमले. खोके वाटले गेले. आमच्या लोकांना तुरुंगात टाकलं, आता बास झालं", असे म्हणत राऊतांनी शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT