Sidhu Moos Wala Murder Case : संतोष जाधवसह दोघांना पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली. प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधवसह पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. रविवारी रात्री उशिरा त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

ADVERTISEMENT

२९ मे रोजी सिद्ध मुसेवाला यांची हत्या करण्यात आली होती. सिद्धू मुसेवालावर अंदाधूंद गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या प्रकरणात पोलिसांनी काही शार्प शूटर्सवर संशय असून, यात पुणे जिल्ह्यातील संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ या दोघांचीही समावेश आहे.

मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधवचे गवळी गँगशी संबंध? काय म्हणाल्या आशा गवळी?

हे वाचलं का?

सीसीटीव्हीच्या आधारे पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांची ओळख पटवली. त्यानंतर मागील दोन आठवड्यांपासून पंजाब, दिल्ली आणि पुणे ग्रामीण पोलीस त्यांच्या मागावर होते. सौरभ महाकाळला यापूर्वीच अटक झाली असून, आता पुणे ग्रामीण पोलिसांनी संतोष जाधवसह आणखी एकाला अटक केली आहे.

संतोष जाधवला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर नवनाथ सूर्यवंशी असं अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या आरोपीचं नाव आहे.

ADVERTISEMENT

पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर रविवारी रात्री उशिरा न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने दोघांनाही २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ADVERTISEMENT

Sidhu Moose Wala वर गोळ्या झाडणाऱ्या पुण्यातल्या संतोष जाधवची आई म्हणते……

२९ मे रोजी सिद्धू मुसेवाला याच्यावर पंजाबमधील मनसा जिल्ह्यातील जवाहर गावाजवळ हल्ला करण्यात आला होता. गाडीतून जात असताना सिद्धू मुसेवालावर अंदाधूंद गोळीबार करण्यात आला. यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज खंगाळून काढले.

आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात वेगवेगळी माहिती पोलिसांच्या हाती लागली असून, पोलिसांनी काही शार्प शूटर्सवरही संशय आहे.

सात आरोपी कोण?

जगरुप सिंग रुपा (तरणतारण, पंजाब)

हरकमल ऊर्फ रानू (भटिंडा, पंजाब)

प्रियव्रत ऊर्फ फौजी (सोनीपत, हरयाणा)

मनजीत ऊर्फ भोलू (सोनिपत, हरयाणा)

सौरव ऊर्फ महाकाळ (पुणे, महाराष्ट्र)

संतोष जाधव (पुणे, महाराष्ट्र)

सुभाष बनौदा (सिकर, राजस्थान)

सिध्दू मूसेवाला हत्या प्रकरण: अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत झाली वाढ,नेमकं काय आहे कारण?

पोलिसांनी गेल्या आठवड्यात महाकाळला अटक केली होती. मंचर पोलीस ठाण्यात मकोका कायद्याखाली दाखल असलेल्या एका गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आलेली आहे. सध्या पंजाब पोलीस आणि दिल्ली पोलिसांचं विशेष पथक महाकाळची चौकशी करत आहे.

मुंबई पोलिसांनीही महाकाळची चौकशी केली आहे. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी महाकाळची चौकशी केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT