सातारा जिल्हा हादरला! घरात आढळले एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Satara Crime News : The door of the house was locked from inside and it became clear that four people in the house died after the villagers broke the door and entered the house.
Satara Crime News : The door of the house was locked from inside and it became clear that four people in the house died after the villagers broke the door and entered the house.
social share
google news

Satara Crime News : इर्शाळवाडी दरड घटनेमुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली असतानाच सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळून आले आहेत. त्यामुळे ही सामूहिक आत्महत्या आहे की, त्यांच्यासोबत घात झालाय, असे तर्कविर्तक लावले जात आहे. एका नातेवाईकांला संशय आल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. (The dead bodies of four members of the same family were found at Sanbur in Patan taluka of satara district)

ADVERTISEMENT

पाटण तालुक्यातील सणबूर येथे शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, घटनेचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

वाचा >> Kirit Somaiya : ‘महिलांना फोन करून…’, सोमय्यांच्या व्हिडीओवर अनिल परबांनी काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त शिक्षक आनंदा पांडुरंग जाधव, सुनंदा आनंदराव जाधव, संतोष जाधव आणि पुष्पा धस अशी मृतांची नावे आहेत. आनंदा पांडुरंग जाधव यांचे एक नातेवाईक त्यांना सकाळी अकरा वाजेपर्यंत कॉल करत होते. मात्र, समोरून कोणताही प्रतिसाद येत नव्हता.

हे वाचलं का?

दार उघडले आणि धक्काच बसला…

आनंदा जाधव यांच्या कुटुंबातील कुणीही कॉल उचलत नसल्याने, तसेच कोणताच रिप्लाय येत नसल्याने नातेवाईकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर आनंदा जाधव यांच्या जवळच्या नातेवाईकाने घराकडे धाव घेतली. त्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा बघितला. दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर त्यांनी आजूबाजू्च्या ग्रामस्थांना बोलावलं आणि रामस्थांनी तो दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरात पाय ठेवल्यानंतर चौघांचे मृतदेह दिसून आले.

चौघांचा मृत्यू… कारण अस्पष्ट…

या घटनेचे कारण अस्पष्ट असले तरी घटनेबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडला नेण्यात येणार असून, तो शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

मुलांना फेकलं विहिरीत… पुणे जिल्ह्यात डॉक्टरने संपवलं कुटुंब

पुणे जिल्ह्यातही पशुवैद्यकीय डॉक्टरनेच कुटुंबाला संपवल्याची घटना साताराला लागून असलेल्या पुणे जिल्ह्यात घडली होती. दौड तालुक्यातील वरवंड गावातील पेशाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा घोटून खून केला होता, तर दोन मुलांना विहरीत फेकून दिले होते. यानंतर डॉक्टराने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली होती. संपूर्ण कुटुंबाच्या या मृत्यूनंतर पुणे हादरले होते. या हत्याकांडानंतर पोलिसांना घटनास्थळावर सुसाईड नोट सापडली आणि त्यामुळे हत्याकांडामागच कारण समोर आलं होतं.

ADVERTISEMENT

वाचा >> Exclusive: अजित पवार अमोल मिटकरींना महिन्याला 50 हजार का पाठवायचे?, मुंबई Tak वर खुलासा

डॉक्टर अतुल दिवेकर यांनी सुसाईड नोटमध्ये पत्नी गैरवर्तन करत असल्याचा आरोप केलेला होता. अतुल आणि पल्लवी यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून शुल्लक कारणावरून भांडणे होत होती. दररोजच्या या भांडणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. घटनेपूर्वीही दोघांमध्ये कडाक्याची भांडणं झाली होती. याचाच अतुलला राग अनावर झाला आणि त्याने संपूर्ण कुटुंबाला संपवलं, असं सुसाईड नोटमधून समोर आलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT