Sharad Mohol : मोहोळ हत्याकांडाचं ‘मुळशी’ कनेक्शन आलं समोर; ‘या’ टोळीवर संशय
शरदचा अचूक वेध घेता यावा म्हणून मुन्ना पोळेकर याच्यासह त्याचा इतर साथिदारांनी मुळशीत गोळीबाराचा सराव केल्याची नवीन माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे.
ADVERTISEMENT
Sharad Mohol murder Case : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा छाताडावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या घटनेने पुणे हादरले आहे. असे असताना दररोज या प्रकरणात नवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात आता शरद मोहोळची हत्या टोळीयुद्धातून झाल्याचा संशय आता पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याचसोबत शरदच्या हत्येपुर्वी पोळेकरने त्याच्या साथिदारासह मुळशीत गोळीबाराचा सराव केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शरद मोहोळ हत्या प्रकरणात नेमक्या कोणत्या टोळीचा हात आहे? याचा तपास आता पुणे पोलीस (Pune Police) करीत आहेत. (sharad mohol murder case suspected gang killed and accused practiced firing in mulashi area and pune gangwar news)
ADVERTISEMENT
कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येचा कट त्याच्याच टोळीत शिजत होता. मात्र त्याला काडीमात्र याची कल्पना नव्हती. या संपूर्ण हत्याकांडाचा मास्टरमाईड 20 वर्षीय मुन्ना उर्फ साहिल पोळेकर आणि मामा उर्फ नामदेव कानगुडे होता. या दोन्ही मास्टरमाईंडने लग्नाच्या वाढदिवशीच त्याचा गेम केला होता,अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र आता पोलीस तपासात नवीन माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा : Mumbai Crime : “आमच्यावर ऑफिसमध्ये बलात्कार, गर्भपात…”, आठ महिला पोलिसांच्या पत्राने खळबळ
शरद मोहोळ हा दुपारच्या सुमारास घरी आला होता. त्या दिवशी त्याच्या लग्नाचा वाढदिवस देखील होता. त्यामुळे तो दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडला होता. याच दरम्यान घराबाहेर घात घालून बसलेल्या मुन्ना ऊर्फ साहिल पोळेकरने आणि त्याच्या साथीदारांनीस त्याच्या छाताडावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. या हत्याकांडानंतर घटनास्थळावरून पळून जात असताना त्यांनी एका गँगस्टरचे नाव घेतले होते. त्यामुळे शरद मोहोळची हत्या ही एका टोळीयुद्धातून झाल्याचा संशय आता पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हे वाचलं का?
शरद मोहोळच्या हत्येचा कट गेल्या पाच-सहा महिन्यापासून टोळीत शिजत होता. तसेच त्याला मारण्यासाठी प्रकाश नावाच्या एका व्यक्तीकडून 3 पिस्तुले आणि 11 काडतूसे खरेदी करण्यात आली होती. शरदच्या हत्येसाठी गेल्या अनेक महिन्यापासून मुन्ना पोळेकर पिस्तुलीतून गोळीबाराचा सराव करत होता. या प्रकरणात शरदचा अचूक वेध घेता यावा म्हणून मुन्ना पोळेकर याच्यासह त्याचा इतर साथिदारांनी मुळशीत गोळीबाराचा सराव केल्याची नवीन माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे.
हे ही वाचा : Lok Sabha 2024 : राणे-सामंत संघर्ष पेटणार की शमणार! शिंदे काय देणार ‘मेसेज’?
दरम्यान आता शरद मोहोळची हत्या खरंच टोळी युद्धातून झाली आहे का? तसेच त्याच्या हत्येमागे नेमक्या कोणत्या टोळीचा हात आहे? याचा तपास आता पोलीस करीत आहेत.
ADVERTISEMENT
जुन्या वादातून काढला काटा
मुना उर्फ साहिल पोळेकर यांचा सख्खा मामा नामदेव महिपती कानगुडे आणि मावस मामा विठ्ठल किसन गांडले यांचा शरद मोहोळशी जुना वाद होता. या जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी त्यांनी भाचा मुन्ना उर्फ साहिल पोळेकर याच्याद्वारे हत्येचा कट रचला होता. या हत्येसाठी साहिलने चारच महिन्यापूर्वीच पिस्तूल खरेदी केली होती. या पिस्तुलातून गोळीबार करण्याचा त्याने अनेक महिने सराव देखील केला होता. या दरम्यानच मामा नामदेव कानगुडे यांनी त्यांचा शरद मोहोळ टोळीत प्रवेश घडवून आला होता. टोळीत प्रवेश केल्याचे काही दिवसातच तो शरद मोहोळ सोबत फिरायला लागला होता. शरद मोहोळ ज्या ज्या ठिकाणी भेटी द्यायचा, त्या त्या ठिकाणी मुन्ना पोळेकर हजर राहायचा. त्यामुळे अवघ्या काही दिवसातच मुन्ना शरद मोहोळच्या जवळ पोहोचला होता.
ADVERTISEMENT
शरद मोहोळसोबत असताना मुन्ना नेहमी त्याची हत्या करण्यासाठी पिस्तूल बाळगून असायचा. मात्र ठिकाण आणि मोहोळसोबत असणारी समर्थकांची गर्दीमुळे ते शक्य व्हायचे नाही. त्यात शुक्रवारी शरद मोहोळचा लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे शरद मोहोळ त्याची घरी गेला आणि दुपारी घरात जेवण केल्यानंतर तो पत्नीसह दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी निघाला होता. या दरम्यान शरद मोहोळच्या सुरक्षेसाठी आरोपी वगळता दोघेच असल्याचे पाहुन मुन्नाने डाव साधला आणि शरद मोहोळ घराबाहेर पडताच त्याच्या छाताडावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. विशेष म्हणजे टोळीत प्रवेश केल्याच्या 25 दिवसातच त्याने शरद मोहोळचा गेम केला होता.
दरम्यान शरद मोहोळ हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींपैकी 6 आरोपींना 10 जानेवारीपर्यंत आणि दोन वकिलांना 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT