Sandeep Thapar : शिवसेना नेत्यावर जीवघेणा हल्ला,भर रस्त्यात तलवारीने संपवण्याचा कट; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

shiv sena punjab leader sandeep thapar gora attack in ludhiana punjab video viral
संदिप थापर हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी आले होते
social share
google news

Sandeep Thapar Attack : शिवसेना नेते आणि शहिद सुखदेव यांचे नातेवाईक संदीप थापर गोरा यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची दुदैवी घटना घडली आहे. निहंगांच्या (सशस्त्र शीख योद्धे किंवा अकाली दल) वेशात आलेल्या अज्ञात इसमांनी धारदार तलवारीने त्यांच्यावर सपासप वार करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती नाजूक आहे. या हल्ल्याचा थरारक व्हिडिओ आता समोर आला आहे. (shiv sena punjab leader sandeep thapar gora attack in ludhiana punjab video viral)  

ADVERTISEMENT

पंजाबच्या (Punjab) लुधियानामध्ये ही घटना घडली आहे. संदिप थापर हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी आले होते. हा कार्यक्रम आटोपून संदिप थापर आपल्या गनमॅनसह स्कुटीवरून जात असताना अचानक काही निहंगांच्या वेशातील माणसे त्यांच्या गाडीजवळ येतात. या दरम्यान सुरुवातीला हे निहंग संदिप थापर यांच्या गनमॅनला गाडीवर उतरवतात आणि त्याची बंदुक हातात घेतात. 

हे ही वाचा : Rohit Sharma: '...नाहीतर मी सूर्याला बसवलं असतं', रोहितची मराठीतून तुफान फटकेबाजी; भाषण जसंच्या तसं

Very shocking video coming from Punjab : Punjab Shiv Sena leader Sandeep Thapar is brutally attacked by Nihangs. He's fighting for life in hospital.

It seem there was a police officer with him but didn't even try to help him. pic.twitter.com/z3rpqwwQAD

हे वाचलं का?

थापर यांच्या सुरक्षारक्षकाला बाजूला केल्यानंतर निहंग तलवारीने संदिप थापर यांच्यावर सपासप वार करतात. या हल्ल्यात संदिप थापर रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडतात. या घटनेनंतर निहंग थापर यांची स्कुटी घेऊन पसार होतात. या हल्ल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. 

या हल्ल्यानंतर संदीप थापर यांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे. या थापर यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Mazi Ladaki Bahin Yojana: 1500 रुपये कधी मिळणार? अजितदादांनी तारीखच सांगून टाकली!

या प्रकरणी आता शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनीही या घटनेबाबत भगवंत मान सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले की, लुधियानामध्ये एक अतिशय अस्वस्थ करणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीवर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे, त्याच्यासोबत सुरक्षा कर्मचारीही उपस्थित होते.

ADVERTISEMENT

गजबजलेल्या भागात दिवसाढवळ्या असे हिंसक हल्ले ज्या प्रकारे होत आहेत, त्यावरून पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री भगवंत मान सरकारने झोपेतून जागे व्हावे आणि सुरक्षेसाठी तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी टीका त्यांनी केली आहे. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT