Sindhudurg Crime : 19 वर्षीय दीर 35 वर्षीय वहिनीसोबत भाड्याच्या खोलीत राहिला, नंतर…

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

sindhudurg crime story brother killed husband wife sawantwadi crime news
sindhudurg crime story brother killed husband wife sawantwadi crime news
social share
google news

Sindhudurg Crime Story : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका विवाहितेची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. चैत्राली निलेश मेस्त्री (35) असे या विवाहितेचे (Married Women) नाव आहे. प्राथमिक माहितीनूसार चैत्रालीने सुरुवातीला आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती.मात्र या घटनेचा सखोल तपास केला असता ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे उघड झाले आहे. चैत्रालीच्या 19 वर्षीय दिरानेच तिची हत्या केली होती.त्यामुळे दिराने चैत्रालीची हत्या का केली? हे जाणून घेऊयात. (sindhudurg crime story brother killed husband wife sawantwadi crime news )

रत्नागिरीच्या खेड येथील रहिवाशी असलेल्या निलेश मेस्त्री यांच्याशी चैत्रालीचा विवाह झाला होता. या लग्नापासून दोघांना तीन मुले आहेत. निलेश मेस्त्री हा दारू पिऊन सतत चैत्रालीला मारहाण करायचा. या मारहाणीला कंटाळून चैत्राली तिच्या माहेरी पुण्यात आईकडे निघून गेली होती. यानंतर चैत्रालीचा चुलत दीर संदेश मेस्त्री तिच्या माहेरी गेला होता. माहेरी जाताच दीर संदेशने तिला त्याच्यासोबत गोव्यात येण्याची विनंती केली. दिराला देखील दारूचे व्यसन असल्याने चैत्रालीने सुरुवातीय त्यास नकार दिला होता.

हे ही वाचा : MLA Disqualification : “मंत्री केलं नाही म्हणून उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला?”

चैत्रालीला इतक्या विनंत्या करून देखील तिने येण्यास नकार दिल्याने, अखेर दीर संदेशने चैत्रालीला तुझ्या मुलांना जीवे ठार मारेन अशी धमकी दिली होती. या धमकीनंतर चैत्राली दिरासोबत गोव्याला जाण्यास सुरूवात केली. त्यानंतर दिराने तिला गोव्यात नेण्याच्या बहाण्याने सांवतवाडीत उतरवले आणि भाड्याच्या घरात ठेवले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सावंतवाडी सबनीसवाडा येथे साधारण दोन महिने दोघे एकत्र भाड्याच्या खोलीत राहिले. या दरम्यान दीर तिकडे कामालाही लागला होता. या भाड्याच्या घरात चैत्रालीसोबत तिचा आठ वर्षाचा मुलगा देखील होता. घटनेच्या दिवशी संदेश आणि चैत्राली घराबाहेर पडले. दोघेही चिकन आणि मासे घरी घेऊन घरी परतले होते. त्यानंतर दीर कामाला निघून गेला. दुपारी घरी परतल्यानंतर दिराने मुलाला घराबाहेर खेळायला पाठवून चैत्रालीला दुपारी जेवायला का नाही वाढलेस, अशी विचारणा केली. या दरम्यानच दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि या वादातूनच रागाच्या भरात दिराने चैत्रालीला मारहाण करायला सुरूवात केली.

हे ही वाचा : Bhajanlal Sharma : भाजपला का हवा होता ब्राह्मण चेहरा? मुख्यमंत्री निवडीची Inside Story

या दरम्यान दिराने तिचे डोकं भिंतीवर जोरजोरात आपटायला सुरूवात केली. या मारहाणीत ती बेशुद्ध झाली होती. यानंतर दिराने तिला हॉल ते किचन असे फरफटत नेत ओढणीने गळ्याभोवती फास लावून छपरावर लटकवून दिले होते. त्यानंतर ओढणी कापून तिचा मृतदहे खाली उतरूवून तिचा मृत्यू झाला आहे की नाही, हे तपासण्यासाठी पायाला स्टोव्हचे चटके दिले होते. त्यानंतर चैत्रालीच्या मुलाला घरात बोलावून आईने आत्महत्या केल्याची माहिती दिली होती.

ADVERTISEMENT

स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळवले. यावेळी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत घटनेचा तपास सूरू केला होता. प्राथमिक माहितीनुसार चैत्रालीने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. मात्र पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असता तिच्या शरीरीवर जखमा आढळल्या होत्या. त्यामुळे चैत्रालीची आत्महत्या नसून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते.

ADVERTISEMENT

या प्रकरणी पोलिसांनी दीर संदेश मेस्त्रीची चौकशी केली असता त्याने हत्येची कबूली दिली. तसेच चैत्रालीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आता दीर संदेश मेस्त्रीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT