Crime : डोकं जमिनीवर आपटलं, पोटात लाथा-बुक्क्या… नणंद अन् सासूने घोटला सुनेचा गळा
मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हद स्काटर कॉलनीत नणंद, सासू आणि सासरा या तिघांनी मिळून सुनेची हत्या केल्याची माहिती
ADVERTISEMENT
Crime News in marathi :
ADVERTISEMENT
मुंबई : येथील मालाडमधून धक्कादायक घटना समोर येत आहे. येथील मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हद स्काटर कॉलनीत नणंद, सासू आणि सासरा या तिघांनी मिळून सुनेची हत्या केल्याची माहिती उघडकीस आली आहे. आयशा सय्यद असं मृत सुनेच नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 10 लाखांच्या व्यवहारातून ही हत्या झाली आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. (sister-in-law mother-in-law and father-in-law together killed the daughter-in-law)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 6 महिन्यांपूर्वी अकबर सय्यद यांनी मुलगा इरफान आणि सून आयशा यांना घर बांधण्यासाठी 10 लाख रुपये दिले होते. मागील काही दिवसांपासून अकबर सय्यद मुलगा आणि सूनेकडे वारंवार पैसे परत मागत होते.मात्र पैसे परत करत नसल्याने वारंवार खटके उडत होते. रोज हा वाद वाढत गेला होता. या दरम्यान, आठवडाभरापूर्वीही पैशांवरून वाद सुरू झाला होता.
हे वाचलं का?
हे ही वाचा : रुमवर भेटायला बोलावलं,अन् शिक्षक झाला हनीट्रॅपचा शिकार
काल (शनिवारी) संध्याकाळी पुन्हा एकदा सासू, सासरा आणि नणंद यांच्यासोबत आयशाचे वाद झाले. काही वेळातच वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. सासू रोकय्या सय्यद आणि तिची मुलगी गौरी सय्यद यांनी सून आयेशाचे केस पकडून तिला जमिनीवर आपटले. यात आयशा गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्यातून रक्क वाहू लागलं होतं. यानंतरही तिघांनी आयशाला पोटात लाथा-बुक्यांनी मारहाण केली.
हे ही वाचा : इंस्टाग्रामवरच्या मैत्रीने केला घात, अल्पवयीन मुलीवर चौघांकडून सामूहिक बलात्कार
मारहाण इतकी गंभीर होती की, यातच आयशाचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी पंचनामा केला. यानंतर पोलिसांनी सासरा अकबर सय्यद, सासू रोकय्या सय्यद आणि मेहुणी गौरी सय्यद यांना मालवणी येथून अटक केली आहे. अधिक तपास मालवणी पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT