पुणे हादरलं! लंडनमध्ये नोकरीला जाण्याआधीच वहिनीचा खून, पळून जाणारा दीरही ठार
step brother killed big brother and wife : सावत्र भावाने रागाच्या भरात भाऊ आणि भावजयीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही हत्या केल्यानंतर पळून जाताना आरोपीला रस्ते अपघात झाला, या अपघातात आरोपीचा मृत्यू झाला. सध्या या घटनेने पुणे हादरलंय.
ADVERTISEMENT
Step brother killed big brother and wife : स्मिता शिंदे,पुणे : पुणे एका धक्कादायक घटनेने हादरलं आहे. भावाचा राग मनात ठेवून सावत्र भावानेच वहिनीची आणि भावाची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या हत्येत 27 वर्षीय वहिनी प्रियांकाचा जागीच मृत्यू झाला तर 30 वर्षीय भाऊ सूनील या हत्येत गंभीर जखमी झाला असून बचावला आहे. ही हत्या केल्यानंतर पळून जाताना आरोपीला रस्ते अपघात झाला, या अपघातात आरोपीचा मृत्यू झालाय. या प्रकरणात आता सूनीलच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास सूरू आहे.(step brother killed big brother and wife shocking crime story from pune)
ADVERTISEMENT
घटनाक्रम काय?
पुण्याच्या (Pune) या हादरवून सोडणाऱ्या घटनेप्रकरणी मुलाचे वडील बाळासाहेब पोपट बेंद्रे (59) यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये (Police) तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,थोरला मुलगा सूनील आणि सून प्रियांका बेंद्रे पुण्यामध्ये आयटी कंपनीत कामाला होते.येत्या 1 मे रोजी दाम्पत्य लंडनला नोकरीसाठी जाणार होते.याच कुटुंबातील दुसरा मुलगा अनिल हा पुण्यातील एका कंपनीत काम करत होता. मात्र त्यांच्या वागण्यामुळे त्याला तीन कंपन्या बदलाव्या लागल्या होत्या. कंपनीतील काम गेल्यामुळे तो वैफल्यग्रस्त देखील होता.यातूनच तो गावाला गेला होता. तसेच त्याचा असा समज झाला होता की, भाऊ सूनील मुळे त्याचे काम केले होते.त्यामुळे या गोष्टीचा राग त्याच्या मनात धरला होता.
हे ही वाचा : कोण आहे लेडी डॉन शाइ परवीन, काय आहे तिच्याकडे गुपित?
असा रचला कट
गावी येऊन अनिल सतत भांडणे करत असल्यामुळे ते मिटवण्यासाठी वडिलांनी लंडनाला जाण्यापुर्वी सुनील आणि प्रियांकाला गावी बोलावले होते. यावेळी दोन्ही भावांमध्ये सविस्तर चर्चा झाली.सुनिलने त्याला व्यवस्थित समजावून सांगितले होते. यानंतर कुटुंब झोपले होते. मात्र सकाळ होताच आरडोओरडा सुरु झाला. वडिलांनी जाऊन पाहिले असता,अनिलने भावजय प्रियांका आणि सुनिलची हत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत प्रियांकाचा जागीच मृत्यू झाला तर भाऊ सूनील थोडक्यात बचावला होता. सुनील याला पुणे येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हे वाचलं का?
वडिलांनी आरोपी अनिलला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने घटनास्थळावरून पळ काढला होता. यावेळी अनिल दुचाकीवरून पळून जात असताना न्हावरे – चौफुला रस्त्यावर येणाऱ्या स्विफ्ट कारने त्याला धडक बसली. या धडकेत तोही गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर ससून येथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.सध्या सुनिल यांचीही तब्येत गंभीर असून त्यांच्या छातीवर तसेच डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे. घटनेनंतर वडीलांनी आरोपी अनिल बाळासाहेब बेंद्रे यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे करीत आहेत.
हे ही वाचा : अनेक वर्षांच्या प्रेमाचा भयानक अंत; प्रेयसीला दिलं पेटवून अन् स्वतःलाही संपवलं…
सूनील व प्रियांका हे दोघेही आयटी इंजिनिअर होते. दोघांचे लग्न दोन वर्षापुर्वीच झाले होते. त्यांना लंडन येथे जॉब करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे ते खुप आनंदात होते. 1 मे रोजी ते परदेशात जाणार होते. मात्र काळाने घाला घातला, अन् सुखी संसाराचे स्वप्न अपूर्ण राहीले अशी प्रतिक्रिया प्रिंयाकाचे भाऊ स्वप्निल सयाजी भोसलकर ( वाघोली ) यांनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT