'आज तुझा विषयच मिटवतो..', बँक कर्मचाऱ्याने शिक्षक पत्नीला संपवलं, लेकरांच्या डोळ्यासमोर हत्या

मुंबई तक

Teacher Murder Case : बिहारच्या पूर्णियामध्ये बँक कर्मचाऱ्याने आपल्या दोन मुलांसमोर शिक्षिका असलेल्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. घटनेनंतर आरोपी पती फरार असून, 9 वर्षांच्या मुलाने मामाला फोन करून हत्येची माहिती दिली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

'आज तुझा विषयच मिटवतो..',

point

बँक कर्मचाऱ्याने शिक्षक पत्नीला संपवलं, लेकरांच्या डोळ्यासमोर हत्या

Crime News : बिहारमधील पूर्णिया येथे एका बँक कर्मचाऱ्याने आपल्या दोन मुलांसमोर शिक्षिका पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शालिनी कुमारी (वय 34) असं मृत शिक्षिकेचे नाव आहे. त्या माध्यमिक विद्यालयात कार्यरत होत्या.  शालिनी यांचे पती राजकुमार यादव हे पूर्णियातील को-ऑपरेटिव्ह बँकेत कार्यरत आहेत. ही घटना पूर्णिया जिल्हा मुख्यालयातील खजांची हाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेणु नगर येथे घडली. हत्येनंतर राजकुमार यादव घटनास्थळावरून फरार झाला. घटनेच्या वेळी त्यांची 4 आणि 9 वर्षांची दोन मुले घरातच उपस्थित होती.

हेही वाचा : गळ्याभोवती तार गुंडाळून बलात्कार, सेक्युरिटी गार्डचं विद्यार्थीनीसोबत क्रूर कृत्य

जमिनीच्या पैशावर पती-पत्नीमध्ये सुरु होता वाद 

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, शालिनी आणि राजकुमार यांच्यात विविध कारणांवरून वारंवार वाद होत होते. रविवारी संध्याकाळीदेखील दोघांमध्ये वाद झाला होता. हा वाद त्यांनी एकत्र खरेदी केलेल्या जमिनीवरून झाल्याचे सांगण्यात येत आहे. या जमिनीत राजकुमारने गुंतवलेल्या आपल्या हिस्स्याचे पैसे तो शालिनीकडे परत मागत होता. मात्र, शालिनी ही रक्कम देण्यास असमर्थ असल्याचे सांगत होती. या मुद्द्यावरून दोघांमधील वाद वाढला. त्यानंतर राजकुमारने मुलांसमोरच शालिनीला मारहाण केली आणि घराबाहेर निघून गेला. मोठ्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, घरातून जाताना राजकुमारने ‘आज कहानी ही खत्म कर देते हैं’ असे म्हटले होते.

हेही वाचा : पुणे : एअरफोर्स जवान म्हणून थाटात फिरायचा, टेलरच्या दुकानी गेला पुरता फसला