Thane: अचानक आला अन् 'त्या' मुलीला भररस्त्याच... इंजिनिअरिंगला असलेल्या तरुणाने केलं नको ते!
Thane Crime News: ठाण्यात एका इंजिनियरींग शाखेत शिकणाऱ्या मुलावर शाळेत शिकणाऱ्या मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी एक 9 वीत शिकणारी मुलगी शाळेतून घरी जात असताना ही घटना घडली.
ADVERTISEMENT

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील एक संतापजनक वृत्त समोर आले आहे. एका शाळेत शिकणाऱ्या मुलीचा लैंगिक छळ करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी 18 वर्षीय इंजिनियरींग शाखेत शिकणाऱ्या एका मुलीला अटक केली आहे. ही माहिती शुक्रवारी पोलीस अधिकाऱ्याकडून मिळाली. बुधवारी सकाळी एक 9 वीत शिकणारी मुलगी शाळेतून घरी जात असताना ही घटना घडली.
अधिकाऱ्याने या घटनेसंबंधीची माहिती देताना सांगितले की आरोपी मुलाने शाळेत शिकणाऱ्या मुलीला रस्त्यात मिठी मारली आणि चुकीच्या पद्धतीने तिला स्पर्श केला. अशाप्रकारे मुलीचा छळ झाल्याचे कळ मुलीच्या आईने पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि त्या मुलाच्या विरोधात वागळे स्टेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
हे ही वाचा: सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून! पतीला म्हणाली, तुम्ही 20 वर्षांपासून मला...
नेमकी घटना काय?
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इंजिनियरींग शाखेत शिकणाऱ्या आरोपी मुलाच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 75 (लैंगिक छळ) आणि कलम 78 (पाठलाग करणे) यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ज्या मुलीला या आरोपाखाली अटक करण्यात आली, तो सध्या इंटर्नशिप करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अतुल जगताप यांनी दिली.
मुलींच्या लैंगिक छळामध्ये वाढ
खरंतर, शाळेत शिकणाऱ्या मुलीचा लैंगिक छळ होत असल्याच्या बऱ्याच घटना आपल्यासमोर येत असतात. यासंबंधीची अशीच एक बिहारमध्ये जमुई शहरात घडली होती. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकावर दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप लावण्यात आला होता. सरकारी शाळेचे मुख्याध्यापक शमशेर आलम याने दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीला 20 रुपयांचे अमिश दाखवून तिचा लैंगिक छळ केला.










