केरळमध्ये रेल्वेत आग लावून झाला होता फरार; महाराष्ट्र पोलिसांनी ‘अशा’ आवळल्या मुसक्या

मुंबई तक

केरळमधील कोझिकोडमध्ये रेल्वेच्या डब्याला आग लावून 3 जणांची निघृण हत्या करणाऱ्याला महाराष्ट्रातून अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Kerala's Kozhikode train fire case
Kerala's Kozhikode train fire case
social share
google news

Crime News :

केरळमधील कोझिकोडमध्ये रेल्वेच्या डब्याला आग लावून 3 जणांची निघृण हत्या करणाऱ्या माथेफिरुला महाराष्ट्रातून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरीमधून एटीएस आणि रत्नागिरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, अटकेची कारवाई होताच केरळ पोलिसांच्या एका पथकाने रत्नागिरीत येऊन आरोपीचा ताबा घेतला. (The man who set a train coach on fire in Kerala’s Kozhikode and killed 3 people has been arrested from Maharashtra.)

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे उपमहानिरीक्षक महेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख सैफी असे आरोपीचे नाव असून तो दिल्लीतील शाहिनबाग परिसरातील रहिवासी आहे. गुप्त माहितीच्या आधारे हा माथेफिरु रत्नागिती जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रुग्णालयात जाऊन पाहिलं असता तो तिथून फरार झाला होता. त्यावेळी या व्यक्तीला पोलिसांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकावरुन अटक केली, अशी माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा : पुण्यात गँगवार भडकणार? गजा मारणे प्रकरणात पोलिसांचा ‘तो’ रिपोर्ट का चर्चेत?

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या घटनेवर निवेदन दिले आहे. या अक्षम्य गुन्ह्यातील गुन्हेगाराला इतक्या लवकर पकडल्याबद्दल मी महाराष्ट्र सरकार, पोलीस आणि आरपीएफ-एनआयएचे आभार मानतो, असं ते म्हणाले. तर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार कठोर कारवाई करणार असल्याचं केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी म्हंटलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp