Neet च्या तयारीसाठी कोटात आले अन् जीवनच संपवलं, विद्यार्थ्यांसोबत घडलं काय?
Three Neet student committed suicide : शिक्षण नगरी म्हणून प्रसिद्ध असलेले कोटा आता Neet च्या विद्यार्थ्यांचे सुसाईड स्पॉट बनत चालले आहे. कारण गेल्या 4 दिवसात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची चौथी घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT
Three Neet student committed suicide : शिक्षण नगरी म्हणून प्रसिद्ध असलेले कोटा आता Neet च्या विद्यार्थ्यांचे सुसाईड स्पॉट बनत चालले आहे. कारण गेल्या 4 दिवसात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची चौथी घटना समोर आली आहे. त्यामुळे या भागात नीटच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. दर तीन दिवसात एक विद्यार्थी आत्महत्या करत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आता या आत्महत्या कशा रोखता येईल हे मोठे आव्हान असणार आहे. (three neet student committed suicide in 4 days kota shocking incident)
ADVERTISEMENT
चार दिवसात तीन आत्महत्या
बिहारच्या पटणाचा मुळ रहिवाशी असलेलेचा नवलेश हा गेल्या काही वर्षभरापासून नीटची तयारी करण्यासाठी कोटाच्या लॅंड मार्क सिटीत राहत होता. नवलेश हा बारावी सोबत नीटची तयारी करत होता. या दरम्यानच नवलेशने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने कोटात गेल्या चार दिवसात तिसऱ्या आत्महत्येची घटना घडली आहे. या घटनेने कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे.
हे ही वाचा : ‘नवऱ्याने बेडरूममध्ये लावलाय CCTV कॅमेरा’, बायको म्हणाली; त्याला…
सुसाईड नोटमध्ये काय?
नवलेश आईचा कॉल उचलत नसल्याने कुटूंबियांची चिंता वाढली होती. त्यामुळे कुटूबियांनी त्याची विचारपूस करण्यासाठी एका नातेवाईकाला रूमवर पाठवले होते. यावेळी नातेवाईकाला रूमवर त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांना यावेळी मृतदेहाच्या शेजारी एक सुसाईट नोट सापडली होती. या नोटमध्ये आई-वडिलांना उद्देशून त्याने लिहले की, तुमचं स्वप्न पुर्ण करू शकलो नाही. तसेच हा तरूण कुटूंबियांपासून दुर राहत असल्याने डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
हे वाचलं का?
दुसरी आत्महत्येची घटना
कोटाच्या विज्ञान नगर भागातून दुसरी आत्महत्येची घटना समोर आली होती. ज्यामध्ये एका नीटच्या विद्यार्थ्यांने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना सोमवारी रात्री 10.30 वाजता घडली होती. नासिर हा 22 वर्षाचा असून बंगळुरुचा रहिवाशी आहे. नासिर हा काही दिवसांपुर्वीच मल्टी स्टोर बिल्डिंगमध्ये राहायला आला होता. या बिल्डिंगमध्ये तो 4 तरूणांसोबत राहायचा. नासिरने 7 मे ला नीटची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा पेपर चांगला गेला नसल्याने तो तणावात होता. या तणावातून त्य़ाने आत्महत्या केल्याची माहिती आहे.
हे ही वाचा : …अन् त्याने गाठला क्रूरतेचा कळस! मुलीचा गळा दाबला, पत्नीचं कापल नाक
पहिली घटना
नीटच्या विद्यार्थ्यांची पहिली आत्महत्येची घटना कृष्णा बिहारमधून समोर आली आहे. मुळचा पटनाचा असलेला या तरूणाने आत्महत्या केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा घर बंद होते. त्यामुळे घर मालकासमोर घराचे दार तोडण्यात आले. घराचे दार तोडताच विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. य़ावेळी घटनास्थळावरून सुसाईड नोट देखील सापडली होती. विद्यार्थी हा 12 वी सोबत नीटची परिक्षा देत होता. या अभ्यासामुळे तो तणावात होता. या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याची घटना घडलीय.
ADVERTISEMENT
दरम्यान गेल्या 4 दिवसातील नीट विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची ही तिसरी घटना आहे. या घटनेमुळे विद्यार्थी पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे,.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT