Kolhapur Crime: भाचीच्या लग्नाचं रिसेप्शन, मामाने जेवणात कालवलं विष अन्... असं केलं तरी का?
भाचीनं मर्जीविरोधात विवाह केल्यामुळं संतापलेल्या मामानं जेवणाच्या भांड्यात विषारी द्रव्य मिसळून जीवितहानी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाचीच्या लग्नाचं रिसेप्शन, मामाने केला घातपाताचा प्रयत्न
भाचीने मामाच्या मर्जीविरुद्ध केलं लग्न
मामाने जेवणात विषारी द्रव्य मिसळलं
कोल्हापूर: भाचीनं मनाविरूध्द लग्न केल्यामुळं संतापलेल्या मामानं लग्नानिमित्त आयोजित रिसेप्शनच्या जेवणात विषारी द्रव्य मिसळल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये समोर आलं आहे. सुदैवानं जेवणाच्या भांड्यात विषारी द्रव्य टाकताना, काही व्यक्तींनी बघितलं आणि तातडीनं जेवणाची भांडी बाजूला ठेवून पुन्हा नव्याने जेवण बनवलं. त्यामुळं मोठी जीवितहानी टळली आहे. (uncle mixed poison in food bowl because niece married against her will shocking incident in kolhapur)
पन्हाळा तालुक्यातील उत्रे गांव इथं घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळं एकचं खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणाची आता पोलीस सखोल चौकशी करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील उत्रे गांव इथं रहाणाऱ्या एका युवतीनं आपल्या पसंतीच्या युवकाशी पंधरा दिवसापूर्वी विवाह केला होता. विवाह सोहळ्याला दोन्ही घरची मान्यताही होती. मात्र, आपल्या मर्जीविरोधात भाचीनं लग्न केल्यामुळं मामा चांगलाच चिडला होता.
हे ही वाचा>> Sambhajinagar Honour Killing : जातीबाहेरच्या मुलाशी प्रेमसंबंध, भावाने बहिणीला थेट दरीत ढकललं, क्रिकेट खेळणाऱ्या पोरांमुळे घटना उघड
दरम्यान, लग्नानिमित्त उत्रे गावात पाहुण्यांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. गावाशेजारील एका मंडपात जेवण बनवलं जात होतं. दरम्यान वधूच्या मामानं तयार जेवणाच्या भांड्यामध्ये विषारी द्रव्य मिसळलं. सुदैवानं ही बाब काही लोकांच्या लक्षात येताच, त्यांनी तातडीनं विषारी द्रव्य मिसळलेली जेवणाची भांडी बाजूला नेली आणि नवीन जेवण तयार करून, पाहुण्यांना वाढण्यात आलं.










