हात जोडले, किंचाळत राहिली पण…; 25 वर्षीय तरुणीसोबत चार जणांचं सैतानी कृत्य, व्हिडीओ व्हायरल

रोहिणी ठोंबरे

एका 25 वर्षीय तरुणीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केला. आग्रा येथील होम स्टे हॉटेलमध्ये ही घटना घडली. आरोपींमध्ये एक तरुणीचा मित्र असून, त्याच्यासह पाच जणांनी तिला आधी दारू पाजण्याचा प्रयत्न केला.

ADVERTISEMENT

Uttar pradesh Agra Crime News Gang Rape in Home Stay Hotel no one helped victim 5 Accused Arrested
Uttar pradesh Agra Crime News Gang Rape in Home Stay Hotel no one helped victim 5 Accused Arrested
social share
google news

Crime News : भयंकर… संतापजनक.. हे शब्दही कमी पडावेत अशी घटना समोर आलीये. एका 25 वर्षीय तरुणीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केला. आग्रा (Agra) येथील होम स्टे हॉटेलमध्ये ही घटना घडली. आरोपींमध्ये एक तरुणीचा मित्र असून, त्याच्यासह पाच जणांनी तिला आधी दारू पाजण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर तिला मारहाण केली आणि नंतर आळीपाळीने अत्याचार केले. नराधमांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी तरुणी किंचाळत राहिली. तिच्या आवाजाने परिसरातील लोक हॉटेल बाहेर जमा झाले आणि त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. (Uttar pradesh Agra Crime News Gang Rape in Home Stay Hotel no one helped victim 5 Accused Arrested)

आरोपींच्या जबरदस्तीमुळे घाबरलेल्या पीडित महिलेला जागेवरच लघवी झाली. पीडित महिलेसोबत होम स्टेमध्ये चार तरुणांनी हा गुन्हा केला. तिने या सर्वाला विरोध केल्यावर तिला ओढून मारहाणही केली.

वाचा : अनैतिक संबंधातून पतीसोबत भयानक कांड, झोपेत गळा घोटला, मृतदेहाचे तुकडे तुकडे…

महिलेचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. तिला जबरदस्तीने खोलीत नेऊन अमानुष मारहाण केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल होम स्टेमध्ये चार तरुण आणि एक महिला अशा पाच जणांनी पीडितेला जबरदस्तीने दारू पाजली आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेचे वय सुमारे 25 वर्षे आहे. तिने सांगितले की, याआधी तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवण्यात आला होता आणि त्याबद्दल तिला ब्लॅकमेल केले जात होते. आरोपींनी तिच्या डोक्यात काचेची बाटलीही फोडली होती. ताजगंज पोलीस स्टेशन हद्दीतील ताजनगरी फेज 2 मध्ये हे हॉटेल होम स्टे आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp