उसाच्या शेतात रंगेहाथ पकडलं, तरुणांनी प्रेमीयुगुलाला दिली भयानक शिक्षा
प्रेमीयुगुल भेटण्यासाठी म्हणून शेतात गेले होते, त्यावेळी तेथे काही तरुण आले आणि त्यांना मारहाण करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरलही करण्यात आला होता, तो व्हिडीओ पाहूनच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावत आतापर्यंत 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
UP Crime : उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. काही तरुणांनी प्रियकराला उसाने मारहाण करून शिवीगाळही केली आहे. तर ते तरुण मारहाण करूनच फक्त थांबले नाहीत तर त्यांनी त्यावेळी त्यांनी दोघा प्रियकर आणि प्रेयसीचा एक व्हिडिओही बनवला आहे. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेमीयुगुल (Boyfriend-girlfriend) ज्यावेळी भेटण्यासाठी म्हणून शेतावर आले होते, त्यावेळी गावातील काही तरुणांनी त्यांना पकडून मारहाण करून व्हिडीओ बनवण्यात आला होता.
ADVERTISEMENT
व्हिडीओ व्हायरल
गावातील त्या तरुणांनी ज्यावेळी प्रेयसीला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी प्रियकर त्यांना सांगत होता की, आम्ही दोघं नातेवाईक आहोत. मागील वर्षभरापासून आम्ही एकमेकांना ओळखतो आणि एकमेकांवर प्रेमही करतो. आता फक्त बोलण्यासाठी इथे आलो आहे. तरीही त्या तरुणांनी प्रियकराचे ऐकून न घेता मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना उठाबशाही काढण्सा सांगून त्या दोघांचा व्हिडीओ बनवण्यात आला. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याने त्याची माहिती नजिबाबाद पोलिसांना मिळाल्यामुळे त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली.
हे ही वाचा >> Solar Explosive Company Blast : …अन् झाला स्फोट! 9 कामगारांचा जागीच गेला जीव
पॉक्सो कायद्यातंर्गत गुन्हा
या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केल्यानंतर या प्रकरणी 4 युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर यामध्ये दोघंजण अल्पवयीन असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या मुलीला मारहाण करून जिचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे, त्या मुलीने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी शोएब आणि शहजाद या दोघांविरोधात पॉक्सो कायद्यातंर्गत त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्याच बरोबर जे अल्पवयीन दोन तरुण आहेत, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयासमोर दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर या घटनेत आणखी काही तरुण सहभागी असल्याचेही पोलिसांनी सांगितले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
हे वाचलं का?
दोघं जण अल्पवयीन
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ दोन दिवसांपूर्वीचा असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. गावातीलच तरुण-तरुणी दोघं एकमेकांना भेटण्यासाठी शेतात गेली होती, तेव्हा त्याच गावातील काही तरुणांनी त्यांना पकडून शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली होती. त्याचवेळी त्यांना उठाबशाही काढायला लावल्या होत्या, व त्याचा व्हिडीओ करून तो त्या तरुणांनी व्हायरलही केला होता. त्या प्रकरणी आता दोन युवकांना ताब्यात घेऊन अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
हे ही वाचा >> Crime : पोटच्या पोरानेच केली आईची हत्या, मृतदेह घेऊन ट्रेनमध्ये फिरला अन्….
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT